इन्फ्राटेक : नवी मुंबई-ठाणे गुंतवणुकीसाठी परिपूर्ण पर्याय

इन्फ्राटेक : नवी मुंबई-ठाणे गुंतवणुकीसाठी परिपूर्ण पर्याय

नवी मुंबईहून दक्षिण मुंबई कडे जलदगतीने पोहचणे ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट आता न्हावाशेवा सीलिंक प्रकल्पामुळे शक्य होत आहे. आगामी मेट्रो प्रकल्प, जलवाहतूक, भाऊचा धक्का ते बेलापूर व नेरुळ, तसेच नवी मुंबई पोर्ट ट्रस्ट ने हॉवरक्राफ्ट व सीप्लेन्स साठी दिलेली मान्यता ज्यामुळे ठाणे, कल्याण व वसई फारच सहजतेने जोडला जाणार आहे. सिडको मार्फत कोस्टल रोडला मान्यता मिळाल्यामुळे आज मुंबई मरीन ड्राईव्ह चे आलिशान राहणीमान येथे अनुभवता येणार आहे. तसेच हा परिसर वेगाने विकसित होत असल्यामुळे कॉर्पोरेट पार्क साठी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात आली आहे.

गेल्या 15 वर्षांपासून 36 हजारांपेक्षा अधिक ग्राहकांचा विश्वास संपादन करणारी व अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित इन्फ्राटेक ही संस्था ग्राहकांचे हित जोपासत अविरतपणे याच ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील विकासात आपला खारीचा वाटा उचलत आहे. संस्थेने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा जवळ, शिवडी – न्हावाशेवा सी लिंक व ठाणे शहरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर तसेच ठाणे व भिवंडी महानगरपालिका लगत असलेल्या अगदी मोक्याच्या व उच्च मूल्य असलेल्या स्थानी शासनाचे ऊझठ झालेले प्लॉट विक्रीकरिता उपलब्ध केले आहेत. त्याचबरोबर वसई (नागळे -खरबाव ), कशेळी, काल्हेर आणि डुंगे येथील मोक्याच्या ठिकाणी विविध स्वरूपाचे प्लॉट विश्वसनीय दरात विक्री करिता आहेत. तसेच 35 लाखांपासून पुढे बंगलो प्लॉट पायाभूत सुविधांसह उपलब्ध आहेत.

प्रति गुंठा 2 लाखां पासून प्लॉट विक्री करिता असून 1 रुम किचन 6 लाखांपासून आणि 1 बीएचके 12 लाखांपासून व व्यावसायिक प्लॉट 5 ते 10 लाखांपर्यंतचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. तसेच मेट्रो, एमएमसी कॉरिडॉर, कोस्टल रोड,जलवाहतुक, असे विविध वाहतुकीचे मार्ग जोडले जाणार्‍या परिसरात देखील इन्फ्राटेक चे प्लॉट विक्री करिता उपलब्ध आहेत.

इन्फ्राटेकचे एमडी के . डी राठोड यांनी सांगितले की, त्यांच्या योजना या कॉर्पोरेटस् व ऑफीसर्स प्रमाणे मध्यमवर्गीयां करिता देखील असून त्याकरिता ते अपार्टमेंटस् बनवून 1 रुम किचन पासूनची घरे निर्माण करत आहेत. भूखंडांची कागदपत्रे ही 100% स्पष्ट असून खरेदीखत व इतर कागदपत्र ऑफीस मध्ये येऊन पाहता येतात. त्यामुळे ग्राहकांना त्वरीत कर्ज मिळते. प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवहार हप्ते तत्वावर दरमहा रक्कम देऊन होऊ शकतो. संस्थेचा संपूर्ण व्यवहार हा पारदर्शक स्वरूपाचा असून विनाविलंब विक्री करार करून ग्राहकांच्या हिताला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते, तरी ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन के.डी. राठोड यांनी केले आहे

First Published on: February 20, 2020 2:36 AM
Exit mobile version