नवी मुंबई होणार रंगीबेरंगी

नवी मुंबई होणार रंगीबेरंगी

नवी मुंबई महापालिका मुख्यालय

नवी मुंबई महापालिकेतील पदपथ पुढील काळात रंगीबेरंगी ढंगात दिसू लागले तर आश्चर्य वाटायला नको. नवी मुंबई महापालिका आता पेव्हर ब्लॉक ऐवजी स्टॅम्प काँक्रीटचा वापर करणार आहे. तशा सूचना आयुक्तांनी सर्व विभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. घणसोली सेक्टर ९ येथील उद्यानाच्या पदपथांवर प्रायोगिक तत्वावर स्टॅम्प कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहे. जास्त वर्ष टिकणारे आणि पेव्हर ब्लॉकच्या तुलनेत स्वस्त असणारी ही कल्पना आयुक्तांना आवडल्याने नवी मुंबईत राबवली जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात नवी मुंबई आणखीन आकर्षक होणार आहे.

घणसोलीच्या सेक्टर ९ येथील उद्यानाच्या पदपथांवर हा प्रयोग

नवी मुंबई महापालिका शहर हे विकसित झाल्यावर देशाच्या नकाशावर लवकर नावारुपास आले. त्यात पालिकेकडून राबवले जाणारे नवनवे उपक्रम हे देशात सर्वोच्च स्थान प्राप्त करून देणारे ठरले आहेत. ठाणे पालिका हद्दीत स्टॅम्प काँक्रीटीकरणाचे काम केलेले आहे. या कामाचे फोटो पालिका अधिकाऱ्यांनी पाहिले होते. आयुक्तांनी हे फोटो पाहिल्यावर त्यांनी प्रायोगिक तत्वावर हे काम करण्यास सांगितले होते. त्यानुसार घणसोली येथील सेक्टर ९ येथील उद्यानाच्या पदपाथांवर हा प्रयोग करण्यात आला. आयुक्तांना हे काम आवडले असून पुढील घणसोली दौऱ्यात याची पाहणी केली जाणार आहे.

पेव्हरब्लॉकला पालिकेचा कायमस्वरुपी तिलांजली देण्याचा निर्णय

पालिकेने अडथळा विरहित पदपथ ही योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पेव्हरब्लॉकला पालिकेने कायमस्वरुपी तिलांजली देण्याचा निर्णय घेतला आहे. पेव्हर ब्लॉक्सला कंटाळलेल्या नवी मुंबईच्या जनतेला योजना पचनी पडली आहे. त्यात पालिका नव्या स्टॅम्प काँक्रीटचा पर्याय शहरात आणत आहे. घणसोली येथे प्रायोगिक तत्वावर राबवला गेलेला प्रयोग यशस्वी झाला आहे. इतकी वर्षे काळ्या आणि राखाडी रंगाचे पदपथ पाहत आलेले नागरिक वेगळ्या रंगाच्या पदपथामुळे हरपून गेले आहेत. या उद्यानाच्या समोर रंगीत पदपाथांमुळे तरुण सेल्फी काढू लागले आहेत.


हेही वाचा – महापालिकेतील सर्व शाळांत ‘सीसीटीव्ही’ची करडी नजर

First Published on: October 24, 2018 4:36 PM
Exit mobile version