मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढवावी, नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढवावी, नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

खासदार नवनीत राणा यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात निवडणूक लढवावी, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवेन, असे त्या म्हणाल्या यावेळी त्यानी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचेही सांगितले.

प्रभू श्रीरामाचे नाव घेणे, हनुमंताचे नाव घेणे चूक असेल, तर 14 दिवस काय? मी 14 वर्ष शिक्षा भोगायला तयार आहे.14 दिवसंच काय, 14 वर्ष जरी जेलमध्ये टाकले तरी माझा आवाज तुम्ही दाबू शकत नाही, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी त्यानी महाविकास आघाडीत सत्तेचा सत्तेचा गैरवापर होत असल्याची तक्रार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणासाठी राणा दाम्पत्य मुंबईत धडकले आणि त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना अटक करण्यात आली. 12 दिवस तुरुंगात काढल्यानंतर नवनीत राणा यांची गुरुवारी जामिनावर सुटका झाली होती. त्याच दिवशी नवनीत राणा रुग्णालयात दाखल झाल्या. कारागृहात योग्य वागणूक न मिळाल्याने प्रकृती बिघडल्याचा आरोप नवनीत राणांनी केला आहे.

First Published on: May 8, 2022 12:24 PM
Exit mobile version