Navratri 2023 : नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस 12 वाजेपर्यंत गरबा रंगणार

Navratri 2023 : नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस 12 वाजेपर्यंत गरबा रंगणार

Navratri 2023 : नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस 12 वाजेपर्यंत गरबा रंगणार

मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्यभरात आणि देशभरात नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्री निमित्त अनेक ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी राजकीय तसेच अनेक मंडळांकडून गरबा आयोजित केला जातो. नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस असल्याने गरबा खेळण्याच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणाऱ्या गरब्याची वेळ आता वाढवून रात्री 12 पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे गरबा प्रेमींना रात्री 12 पर्यंत गरब्यावर थिरकता येणार आहे. रात्री 12 वाजेपर्यंतच्या वेळेला राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. (Navratri 2023 : The last three days of Navratri will be celebrated till 12 noon)

हेही वाचा – महाअष्टमीला करा देवी महागौरीची पूजा

मुंबईत अनेक ठिकाणी मोठ्या राजकीय नेत्यांकडून आणि मोठ्या मंडळांकडून गरब्याचे आयोजन करण्यात येते. त्यातही नवरात्रीमध्ये ‘दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठक हिची मोठी क्रेझ पाहायला मिळते. हजारो रुपये खर्च करून गरबा प्रेमी फाल्गुनी पाठकच्या गरब्याचे पास विकत घेतात. फाल्गुनी पाठक हिच्या लोकप्रिय गाण्यांवर थिरकण्यासाठी मुंबईसह देशभरातून गरबाप्रेमी यंदा बोरिवली पश्चिम येथील प्रमोद महाजन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फाल्गुनी पाठक हिचा मुंबईमध्ये गरबा आयोजित करण्यात येतो.

त्याशिवाय मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील नेस्को सेंटरमध्ये रंगीलो रे, वरळीमध्ये डोम दांडिया नाईट्स, बोरिवली पश्चिम येथे कोरा केंद्रात नायडू क्लबचा नवरात्रोत्सव, ऑट्रिया मॉल येथील दांडिया रास असे अनेक मोठे गरबे मुंबईत आयोजित करण्यात येत असतात. मोठ्या गरबा नाईट्समध्ये बॉलीवूडमधील लोकप्रिय गायक आणि कलाकार येथे हजेरी लावून सर्वांचा उत्साह वाढवत असताना देखील पाहायला मिळतात. बऱ्याच ठिकाणी पासेससाठी आयोजकांकडून 499 रुपयांपासून ते काही 1000 रुपये आकारले जातात. नवरात्रीत अष्टमीला विशेष महत्त्व असते. रविवारी असलेल्या अष्टमीनिमित्त शहरातील नवरात्रोत्सव मंडळात आणि देवीच्या मंदिरांमध्ये होम हवन, भंडारा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामुळे आज अनेक ठिकाणी लोकांची गर्दी पाहायला मिळेल.

First Published on: October 22, 2023 12:50 PM
Exit mobile version