नौदलाचा ‘स्मार्ट मॉम : हेल्दी कीड’ उपक्रम

नौदलाचा ‘स्मार्ट मॉम : हेल्दी कीड’ उपक्रम

लहान मुलांना कोणत्याही आजाराची पटकन लागण होते. त्यासाठी त्यांचे वेळोवेळी लसीकरण करणे गरजेचे असते, परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असते. नेहमी ही बाब लक्षात घेऊन करंजा नौदल हॉस्पिटल व नेव्ही वाईव्ह वेल्फेअर असोसिएशन (एनडब्ल्यूडब्ल्यूए)यांच्यातर्फे नुकतेच ‘स्मार्ट मॉम : हेल्दी कीड’ आरोग्य शिबीर करंजा येथे घेण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन एनडब्ल्यूडब्ल्यूएच्या अध्यक्षा वाणी सुब्रमनियम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी करंजा नौदल हॉस्पिटलमधील वरिष्ठ अधिकारी व एनडब्ल्यूडब्ल्यूएचे सदस्य उपस्थित होते.

एनडब्ल्यूडब्ल्यूए व करंजा नौदल हॉस्पिटलतर्फे भरवण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने मुलांची तपासणी करण्यात आली. पालकांना मुलांचे आजार व त्यांच्या आरोग्यासंदर्भात स्क्वॉड्रन लिडर नेहा सक्सेना यांनी मार्गदर्शन केले. या वेळी पालकांनी आपल्या अनेक समस्यांबाबत सक्सेना यांना प्रश्न विचारून शंकाचे निरसन केले. त्याचप्रमाणे आयएनएचएस संधनीवरील कमांडिंग ऑफिसर कॅप्टन एच.एस. चौधरी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. आरोग्य शिबिरामध्ये पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना पुस्तके भेट देण्यात आली. उपस्थित पालकांना उंची, वजन, लसीकरणाची माहिती असणारी कार्ड देण्यात आली. तसेच ज्या मुलांना लसीकरण करण्याची गरज होती, त्यांचे लसीकरण करण्यात आले.

First Published on: September 7, 2018 2:37 AM
Exit mobile version