Drug case: नवाब मलिकांचा नवा खुलासा, सांगितलं सॅम डिसूझाचं खरं नाव

Drug case: नवाब मलिकांचा नवा खुलासा, सांगितलं सॅम डिसूझाचं खरं नाव

Drug case: नवाब मलिकांचा नवा खुलासा, सांगितलं सॅम डिसूझाचं खरं नाव

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात काही दिवश शांतता घेतलेले अल्पसंख्याक मंत्री राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा ट्विट करत एक नवा खुलासा केलाय.  खंडणी प्रकरणात समोर आलेल्या सॅम डिसूझाकडे नवाब मलिकांनी आपला मोर्चा वळवला आहे. सॅम डिसूझाचा एक फोटो ट्विट करत नवाब मलिक यांनी याचे नाव सॅम डिसूझाचा नसून सॅनविल स्टॅनली डिसूझा असल्याचा खुलासा केला आहे. नवाब मलिक यांच्या नव्या खुलाशामुळे या प्रकरणाला एक वळण येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नवाब मलिक यांनी एनसीबीकडून सॅम डिसूझाला त्याचे खरे नाव असलेली नोटीस देखील ट्विट केली आहे. नवाब मलिक रविवारी सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी आणखी नवे खुलासे करणार आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात २५ कोटींच्या खंडणीचे डिल झाले होते. पंच प्रभाकर साईलने सॅम डिसूझावर खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. मात्र मी कोणतीही खंडणी मागितली नाही असे म्हणत सॅम डिसूझाने आरोप फेटाळले आहेत. तसेच खंडणी मी नाही तर किरण गोसावी आणि प्रभाकर साईल या दोघांनी मागितली असल्याचे सॅम डिसूझाने म्हटले. आर्यन खानला अटक झाल्यानंतर हे लोक पळून गेले मात्र मी मुंबईतच होतो. माझ्यावर अनेक आरोप झाल्याने मी माध्यमांसमोर आल्याचे सॅम डिसूझाने सांगितले.

सॅम डिसूझाचा फोटो ट्विट करुन त्याच्या नावाविषयी केलेल्या खुलाशामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नवाब मलिक आज रविवारी सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेऊन अनेक नवे गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील नवाब मलिकांचा मोर्चा सॅम डिसूझाकडे वळल्याने नवाब मलिक पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – आर्यन खान डील प्रकरणात समीर वानखेडेंचा संबंध?; साक्षीदार विजय पगारे यांचा मोठा खुलासा

First Published on: November 7, 2021 8:49 AM
Exit mobile version