Ncb -अन्यनानंतर एनसीबीच्या टार्गेटवर आहेत ‘हे’ स्टार किड्स

सुशांत सिंग राजपूत आत्महत्येनंतर आर्यन खान ड्रग्ज पार्टीप्रकरणामुळे बॉलीवूड पुन्हा एकदा एनसीबीच्या निशाण्यावर आलं आहे. आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये नवोदित अभिनेत्री अन्यया पांडेच नाव पुढे आल्यावर एनसीबी अधिक सावधपणे पावले उचलत असून अनन्याच्या चौकशीतून अजून काही स्टारकिड्सची नाव पुढे येण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने आर्यन, सुहाना आणि अनन्याची बेस्टी असलेली अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरचे नाव समोर येण्याची अधिक शक्यता आहे.

शाहरुखची पत्नी गौरी आणि चंकी पांडेची पत्नी भावना पांडे, संजय कपूरची पत्नी महीप कपूर, अभिनेत्री नीलम कोठारी सोनी आणि सुहैल खानची पत्नी सीमा खान या चांगल्या मैत्रीणी आहेत. यामुळे साहजिकच त्यांच्या मुलांमध्येही चांगली मैत्री आहे. यातून आर्यन, सुहाना, अन्यना आणि शनाया लहानपणापासूनचे मित्र आहेत. पार्ट्या करणे, हायफाय क्लबमध्ये हँगआऊट करणे एकत्र बाहेर फिरायला जाण ही यांची लाईफस्टाईल आहे. यातील फक्त अन्यनाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केल आहे. तर आर्यनला दिग्दर्शनात रस आहे. पण रेड चिलीसाठी तो काम सुरू करण्याच्या तयारीत असतानाच ड्र्ग्ज प्रकरणात अडकला आहे.

यामुळे अनन्याच्या चौकशीत या मित्रमंडळीतील अजून काही जणांची नावे बाहेर येण्याची दाट शक्यता आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे तिची चौकशी करत आहेत. आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अन्ययाकडे तो गांजाची विचारणा करत होता. त्यावर अनन्या त्याला गांजा मिळवून देण्यासाठी तयार होती अस समोर आलं आहे. यामुळे अनन्याचा यात काय रोल आहे. तिचे इतर पॅडलर्सशी काय संबंध आहेत. याचा सखोल तपास एनसीबी करणार आहेत.

First Published on: October 22, 2021 2:43 PM
Exit mobile version