‘मातोश्री’वर उद्या सेनेची महत्त्वपूर्ण बैठक

‘मातोश्री’वर उद्या सेनेची महत्त्वपूर्ण बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या, गुरुवारी आमदारांची बैठक होणार आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची ही बैठक गुरुवारी सकाळी ११.३० वाजता मातोश्रीवर घेतली जाणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांना काय मार्गदर्शन करणार आहेत? यासोबतच भाजपसोबत सत्ता स्थापनेबाबत त्यांची मतंही जाणून घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्याची बैठक ही महत्त्वाची ठरणार असून पुन्हा एकदा राजकीय समीकरण बदलताना दिसणार आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

यासाठी होणार उद्या बैठक

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले राजकीय नाट्य काही केल्या संपताना दिसत नाही. निवडणूक निकालाच्या आठवडाभरानंतरही शिवसेना-भाजपचा सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला दिसत नाही. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच सुटणे कठीण होत चालल आहे. यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार सत्ता वाद सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे उद्या बैठक घेणार असून या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत सेनेची चर्चा होणार असल्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे उद्याची बैठक ही महत्त्वाची ठरणार आहे.

शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक

राज्यात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला गेले आहेत. निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शिवसेना युती धर्म पाळेल’, असा दावा केला होता. मात्र, शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला गेले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीकडून जर शिवसेनेला पाठिंबा मिळाला तर राज्यात भाजपमुक्त सरकार स्थापन होऊ शकते, असा दावा केला जात होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्यात भेटीगाठी होत असल्याची माहिती समोर येत होती. याशिवाय गेल्या आठवड्यापासून संजय राऊत माध्यमांसमोर येऊन शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. यामध्ये शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले.


हेही वाचा – १०५ आकडा ज्यांचा आहे त्यांनी सरकार बनवावे; राऊत यांची गुगली


First Published on: November 6, 2019 4:24 PM
Exit mobile version