‘रनिंग ड्राय’ मोहीम लवकरच मुंबईत; कोलगेटची साथ

‘रनिंग ड्राय’ मोहीम लवकरच मुंबईत; कोलगेटची साथ

'रनिंग ड्राय' मोहिमेच्या फाउंडर- मिना ग्युली

कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड या आघाडीच्या कंपनीने मिना ग्युली यांचा #RunningDry (रनिंग ड्राय) हा उपक्रम पुढे नेत आहे. मिना ग्युली या जागतिक स्तरावरील अॅथलिट व पाणीबचाव कार्यकर्त्या आहेत आणि हे अभियान त्या जागतिक स्तरावर राबवत आहेत. एक ब्रॅण्ड अँबेसिडर म्हणून ‘कोलगेट’ लोकांना ब्रश करत असताना पाण्याचा नळ बंद ठेवण्यास प्रोत्साहित करत आहेत. #EveryDropCounts (एव्‍हरी ड्रॉप काऊंटस्) या तत्त्वावर कोलगेटचा विश्वास असल्यामुळे हे प्रायोजकत्व कोलगेटच्या जागतिक पाणी बचाव मोहिमेचा भाग आहे.  पृथादिन २०१८ नंतर कोलगेटने युगव्हसोबत केलेल्या अभ्यासात असे आढळले की, पाणी बचाव मोहीम जागतिक स्तरावर राबवल्यास दरवर्षी ५० अब्ज गॅलन पाणी वाचू शकेल. “पाण्याचे दुर्भिक्ष्य ही जागतिक समस्या असून पृथ्वीवरील प्रत्येकावर याचा परिणाम होत आहे. जागतिक स्तरावर ४ अब्ज लोक वर्षातील किमान एक महिना पाणीटंचाईचा सामना करतात. दैनंदिन व्यवहारांत पाणी वाचवण्याच्या एका साध्या पण प्रभावी उपायाच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करणाऱ्या कोलगेटसारख्या ब्रॅण्डसोबत काम करता येणे माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे,” असे मिना ग्युली म्हणतात.

‘रनिंग ड्राय’ आता भारतातही…

४ नोव्हेंबर २०१८ रोजी न्यूयॉर्कमध्ये सुरू झालेली #RunningDry (रनिंग ड्राय) ही मोहीम २३ नोव्हेंबर २०१८ रोजी भारतातील नवी दिल्ली (या मोहिमेच्या मार्गावरील सहावा देश) येथे पोहोचली. भारतात ही मोहीम गुडगाव, बवाल, अचरोल, जयपूर, किशनगढ, रैला, भिलवाडा, चित्तोडगढ, बंसवारा, दाहोद, बडोदा, भरुच,अंकलेश्वर, सुरत, नवसारी, बलसाड, ठाणे या मार्गाने प्रवास करत ६ डिसेंबर, २०१८ रोजी मुंबईत पोहोचणार आहे. १०० दिवसांत १०० मॅरथॉन्स मोहिमेचा भाग म्हणून मिना यांनी इंग्लंड, फ्रान्स, इटली, उझबेकिस्तान आणि अराल समुद्रात दौड पूर्ण केली आहे. भारतातील टप्प्यानंतर त्या हाँगकाँग, चीन, दुबई, जॉर्डन, इस्‍त्रायल, पॅलेस्टाइन, इथिओपिया, केनिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चिली, बोलिव्हिया, पेरु आणि मेक्सिको या देशांमध्ये धावणार आहेत. त्यानंतर त्या या मोहिमेदरम्यान अमेरिकेत धावणार आहेत आणि आपली १००वी मॅरथॉन न्यूयॉर्कमध्ये ११ फेब्रुवारी २०१९ रोजी पूर्ण करणार आहेत.

#RunningDry (रनिंग ड्राय) हे संपूर्ण जगाला पाणी वाचवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन असल्याचे, मिना ग्युली करतात. आपण सामना करत असलेल्या पाणी टंचाईच्या संकटाची तीव्रता व्हावी यासाठी, आम्ही या मोहिमेला #RunningDry (रनिंग ड्राय) असं नाव दिलं असल्याचं मिना यांनी सांगितलं. 

First Published on: November 28, 2018 3:02 PM
Exit mobile version