नितेश राणे बालिश; 2004 दंगलींच्या आरोपांवर दानवेंनी दिले ‘असे’ उत्तर

नितेश राणे बालिश; 2004 दंगलींच्या आरोपांवर दानवेंनी दिले ‘असे’ उत्तर

Ambadas Danve

मुंबई : 1992-93 सारखी दंगल 2004 मध्ये घडवण्याचा उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackera) आदेश होता. स्थानिय लोक अधिकार समितीचे माजी सरचिटणीस, एकनाथ शिंदेंना समर्थन देणारे खासदार आणि उद्धव ठाकरेंमध्ये यासंदर्भात बैठक झाली होती. असा मोठा आरोप भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला होता. या आरोपाला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उत्तर देणे टाळले आहे.

अंबादास दानवे नितेश राणेंच्या आरोपावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 2004 त्यावेळस नितेश राणे किती वर्षांचे होता. मी एवढेच सांगने की, बालिश नितेश राणेंवर नको तुम्हाला बाकी काही बोलायचे असेल तर बोला. नितेश राणे काहीही बोलतात, त्याला काय अर्थ आहे, असे बोलून त्यांनी उत्तर देणे टाळले आहे.

काय म्हणाले होते नितेश राणे
नितेश राणे म्हणाले की, 13 ऑगस्ट 2004 रोजी मातोश्रीमध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये स्थानिय लोक अधिकार समितीचे माजी सरचिटणीस आणि आता शिवसेनेचे खासदार ज्यांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिले आहे ते आणि स्वत: उद्धव ठाकरे या तिघांमध्ये मातोश्रीमध्ये बैठक पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितले की, 1992-93 च्या दंगली जशा घडल्या त्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आली तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे. त्या ठिकाणी संबंधित दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांना सांगितले की, चर्नी रोड आणि त्या परिसरातील काही भागात जे काही मुसलमान फेरीवाले आहेत त्यांच्यावर वस्तऱ्याने हल्ला करा आणि त्यानंतर मुंबईमध्ये दंगली घडवण्याची जबाबदारी माझी असेल. हे स्वत: उद्धव ठाकरे म्हणाले होते, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

गृहविभागाने उद्धव ठाकरे हात होता हे तपासले पाहिजे
नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुसलमानांवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. मुसलमानांवर हत्याराने वार करा, तलवारीनी त्यांच्यावर हल्ला करा, जेणेकरून हिंदू मुसलमान दंगली भडकतील आणि त्या दंगलीचा फायदा शिवसेनेला होईल आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनता येईल, हा आदेश त्यांनी दिला होता का? मी संबंधित खासदराला माझ्यासोबत बसवू शकतो आणि संबंधित माजी सरचिटणीसला समोर उभ करू शकतो आणि अशी मिटिंग 13 ऑगस्ट 2004 ला झाली होती का हा प्रश्न मला या निमित्ताने उद्धव ठाकरेंना विचारायचा आहे. तुम्ही सांगा मला ही माहिती खरी आहे की नाही. गेल्या 9 महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या दंगली घडत आहेत, महाराष्ट्र अशांत ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे, यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टोळीचा काही हात आहे का हे या गृहविभागाने तपासले पाहिजे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भडकलेली दंगल, रामनवमी निमित्त मालवणीमध्ये भडकलेली या सर्व दंगलीमध्ये उद्धव ठाकरेंचा हात आहे का, हे गृह विभागाने तपासले पाहिजे, असेही नितेश राणे म्हणाले.

First Published on: May 10, 2023 3:29 PM
Exit mobile version