ब्रॅण्डी हाऊस शाखा बंद होणार नाही – PNB बँक

ब्रॅण्डी हाऊस शाखा बंद होणार नाही – PNB  बँक

पंजाब नॅशनल बँकेची ब्रॅण्डी हाऊस शाखा बंद होणार नाही ( फोटो सौजन्य - Indian express )

पंजाब नॅशनल बँकेची ब्रॅण्डी हाऊस शाखा बंद करण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे पंजाब नॅशनल बँकेने स्पष्ट केले आहे. पंजाब नॅशनल बँकेला नीरव मोदीने १४ हजार कोटींचा चुना लावला. यासंपूर्ण घोटाळयाची पाळेमुळे पंजाब नॅशलन बँकेच्या ब्रॅण्डी हाऊस शाखेमध्ये असल्याचे तपासाअंती पुढे आले. त्यानंतर ब्रॉण्डी हाऊस शाखा बंद होणार असल्याची बातमी समोर आली. पण असा कोणतीही निर्णय झाला नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. शाखेमध्ये सध्या अंतर्गत डागडुजीसह तांत्रिक गोष्टींचे काम सुरू आहे. त्यामुळे शाखा बंद असल्याचे पंजाब नॅशनल बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान ग्राहकांसाठी बँक सुरू असून ग्राहक सेवेमध्ये कोणताही खंड पडला नसल्याचे यावेळी प्रवक्त्याने स्पष्ट केले. १४ हजार कोटींपैकी ७ हजार कोटींचा घोटाळा ब्रॅण्डी हाऊस शाखेतून झाल्याचे तपासाअंती पुढे आले आहे. शिवाय, ब्रॅण्डी हाऊस शाखेतील बँक अधिकाऱ्यांचा देखील या घोटाळ्यातील सहभाग समोर आल्यानंतर पोलिसांनी काही अधिकाऱ्यांना अटक केले आहे.

नीरव मोदीने लावला १४ हजार कोटींचा चुना

पंजाब नॅशलन बँकेला तब्बल १४ हजार कोटींचा चुना लावल्यानंतर नीरव मोदीने परदेशी पळ काढला आहे. या घोटाळ्यामध्ये नीरवचा मामा मेहुल चोक्सी देखील सहभागी असल्याचे समोर आले आहे. सध्या नीरव मोदी परदेशवाऱ्या करत असून इंटरपोलने नीरव मोदी विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. त्यामुळे त्याच्या अटकेची दाट शक्यता असून त्याला लवकरच भारताच्या हवाली केले जाऊ शकते. पंजाब नॅशलन बँकेमध्ये झालेला घोटाळा हा भारतीय बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा मानला जातो. पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा माध्यमांमध्ये आल्यानंतर नीरव मोदीने बँकेला पत्र पाठवले होते. यामध्ये त्याने आपली बदनामी झाली असून आपण कर्ज फेडण्यास असमर्थता दर्शवली होती. लेटर ऑफ अंडरटेकींगचा पुरेपुर वापर करत नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेमध्ये तब्बल १४ हजार कोटींचा घोटाळा केला आहे.

First Published on: July 5, 2018 10:13 AM
Exit mobile version