माओवाद्यांच्या संपर्कात असलेल्या कुख्यात दरोडेखोराला मुंबईत अटक

माओवाद्यांच्या संपर्कात असलेल्या कुख्यात दरोडेखोराला मुंबईत अटक

बोगस डॉक्टर स्वप्ना पाटकरला अटक

नेपाळ मधील माओवाद्यांच्या संपर्कात असणारा कुख्यात दरोडेखोर दलबीरसिंग रावत उर्फ पप्पू नेपाळी याला दरोड्याचा तयारीत असताना मुंबईतील अंधेरी पश्चिम येथुन अटक करण्यात आली आहे. ही कारवाई राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने शनिवारी केली.

अटक करण्यात आलेल्या कुख्यात दरोडेखोर दलबीरसिंग उर्फ पप्पू नेपाळी यांच्याकडून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तुल आणि ३ जिवंत राउंड जप्त केले आहे. दलबीरसिंग रावत हा शनिवारी दुपारी लॉकडाऊनचा फायदा घेऊन अंधेरी पश्चिम येथील मस्तकार पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथक जुहू युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली. दया नायक यांनी पोलीस पथकासह सदर ठिकाणी सापळा रचून दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दलबीरसिंग बलवंतसिंग रावत उर्फ राजा उर्फ पप्पू नेपाळी (३७) याला अटक केली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि ३ जिवंत राऊंड मिळून आले.

अटक करण्यात आलेला दरोडेखोर दलबीरसिंग उर्फ पप्पू नेपाळी याच्यावर मुंबई, ठाणे नवी मुंबईत दरोड्याचे ३० पेक्षा अधिक गुन्हाची नोंद आहे, २०१७ मध्ये त्याने आंध्रप्रदेश येथील विजयवाड्यात एका सोन्या बनवण्याच्या कारखान्यात सशस्त्र दरोडा टाकून सुमारे १६ किलो सोन्याचे दागिने लुटल्याचे त्याच्या चौकशीत समोर आले असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने दिली. दलबीरसिंग उर्फ पप्पू नेपाळी हा नेपाळ मधील माओवाद्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत पुढे आली आहे.


Corona: क्वारंटाईन राहण्यास सांगितल्याने तुंबळ हाणामारी; दोघांची हत्या!

First Published on: May 24, 2020 3:43 PM
Exit mobile version