हे बेस्ट झाले, रविवारपासून बेस्टमध्ये डबलसील

हे बेस्ट झाले, रविवारपासून बेस्टमध्ये डबलसील

बेस्ट बसमध्ये रोज उभा राहून कराव्या लागणाऱ्या प्रवासात मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईत संपुर्ण क्षमतेने बस चालवण्यासाठी बेस्ट उपक्रमाला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता एका सीटवर दोन प्रवासी बसून प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने रविवारपासून म्हणजेच 25 ऑक्टोबरपासून यासाठी परवानगी दिली आहे. बेस्टसोबतच जिम उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जिमसाठीची परवानगी ही कंटेनमेंट झोन वगळून इतर भागातील व्यायामशाळांना मार्गदर्शक तत्वांनुसार सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शनिवारपर्यंत आरोग्य विभागाकडून ही मार्गदर्शक तत्व जारी केली जाणार आहेत. राज्य सरकारनं आज (23 ऑक्टोबर) त्या संदर्भातलं पत्रक जारी केलं आहे. याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरू करण्यास मान्यता दिली होती. लॉकडाऊनमध्ये मार्च महिन्यापासून जिम तसेच फिटनेस सेंटर्स बंद होते. त्यामुळे व्यायाम होत नसल्याने शरीराचे वजन वाढणे, पोट सुटणे अशा गोष्टी घडू लागल्या. तसेच जिम मालक, ट्रेनर याच्या कमाईवर परिणाम झाला. त्यामुळे जिम सुरू व्हावी अशी मागणी राज्यात केली जात होती. त्यामुळे ठाकरे सरकारने जिम सुरू करण्यास परवानगी दिली आहे.


 

First Published on: October 23, 2020 2:01 PM
Exit mobile version