मद्यप्रेमींसाठी खूशखबर; आता रांग नाही, ऑनलाईन टोकन घेऊन मिळणार मद्य

मद्यप्रेमींसाठी खूशखबर; आता रांग नाही, ऑनलाईन टोकन घेऊन मिळणार मद्य

वाईन शॉपवर खरेदी करताना ग्राहक

महाराष्ट्रात मद्य विक्री सुरु केल्यानंतर मद्याच्या दुकानांबाहेर एकच झुंबड उडालेली सर्वांनी पाहिली. आता जेव्हा केव्हा मद्याची दुकाने सुरु होतील, तेव्हा तिथे गर्दी होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य खरेदी करण्यासाठी ई टोकन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यापासून याची सुरुवात होत असली तरीही टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. मुबंई मनपाने ५ मे रोजी मद्यविक्रीवर बंदी आणली होती. त्यामुळे मुबंई मनपा पुन्हा मद्यविक्रीला जेव्हा परवानगी देईल, तेव्हापासून मुबंईत देखील ई टोकन उपलब्ध होईल.

कसे मिळवायचे ई टोकन

सदर सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर चालू केलेली आहे. ज्या ग्राहकांना मद्य खरेदी करायचे आहे अशा ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून इ – टोकन प्राप्त करणे गरजेचे आहे. सुरुवातीला ग्राहकाने आपला मोबाईल नंबर व नाव नमूद करायचा आहे. त्यानंतर आपला जिल्हा व पिन कोड नमूद करायचा आहे आणि सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.

 

त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणा-या मद्य विक्री दुकानांची यादी दिसेल. सदर पैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल. आवश्यक माहिती नमुद केल्यानंतर ग्राहकास इ – टोकन मिळेल. सदर टोकन आधारे ग्राहक आपल्या सोइच्या वेळी सबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून मद्य खरेदी करु शकतात.

First Published on: May 11, 2020 11:05 PM
Exit mobile version