मुंबई पुणे एक्सप्रेस वे साठीही Fasttag अंमलात

मुंबई पुणे एक्सप्रेस वे साठीही Fasttag अंमलात

वेगवान व कॅशलेस प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) व यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पथकर नाक्याच्या सर्व मार्गिकांवर 26 जानेवारी 2021 पासून 100 टक्के फास्टॅग प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे.

फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढण्यासाठी महामंडळाने 11 जानेवारी 2021 पासून वांद्रे-वरळी सागरी सेतू व मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर कार, जीप व एसयुव्ही फास्टॅग वाहनधारकांना प्रत्येक फेरीला 5 टक्के कॅशबॅक देण्यात येत आहे. या कॅशबॅकच्या माध्यमातून फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. फास्टॅगच्या 100 टक्के अंमलबजावणीच्या दृष्टीने महामंडळाने हा निर्णय घेतला.

येत्या 26 जानेवारी 2021 पासुन वांद्रे-वरळी सागरी सेतू व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील सर्व मार्गिका फास्टॅग प्रणालीने सज्ज असतील. ‘या दोन्ही मार्गाच्या पथकर नाक्यांवर उद्यापासून फास्टॅग धारक वाहनांना प्राधान्य राहील. मर्यादित कालावधीसाठी काही लेन हायब्रीड लेन असतील. त्या लेनमध्ये फास्टॅग नसलेले वाहनधारक रोख रक्कमेचा भरणा करु शकतात. पण त्यांना पथकर नाक्याजवळील स्टॉलवरुन फास्टॅग विकत घेऊन गाडीवर लावावा लागेल,’ असे सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले. फास्टॅग मार्गिकेमध्ये विना फास्टॅग अथवा ब्लॅकलिस्टेड टॅग असलेल्या वाहनांनी प्रवेश केल्यास दुप्पट पथकर फी भरावी लागणार आहे.


 

First Published on: January 25, 2021 8:28 PM
Exit mobile version