आता रुणालयातील खाटा शोधा ‘एअर व्हेंटी’ Appवर!

आता रुणालयातील खाटा शोधा ‘एअर व्हेंटी’ Appवर!

आता रुणालयातील खाटा शोधा 'एअर व्हेंटी' Appवर!

कोरोना रुग्णांना महापालिकेसह खासगी रुग्णालयांमध्ये खाट उपलब्ध होत नसून या सर्व रुग्णालयांची माहिती नागरिकांच्या मागणीनंतर महापालिकेने डॅशबोर्डवर आणली. आता या डॅशबोर्डवरील माहिती मोबाईल अॅपवर आली असून आता नागरिकांनी मोबाईलमध्ये एअर व्हेंटी अॅप डाऊनलोड केल्यास क्लिकवर मुंबईतील कुठल्या रुग्णालयात आयसीयू बेड व व्हेंटिलेटर कार्यान्वित आहेत याची माहिती मिळणार आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते बुधवारी महापौर निवासस्थानी आयोजित एका कार्यक्रमात एअर व्हेंटी या ॲपचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाच्या डॅशबोर्ड सोबत हे अॅप संलग्न राहणार असून मुंबईच्या संपूर्ण रुग्णालयाची माहिती या ॲपद्वारे मिळणार आहे. महापालिकेच्या अॅपवर या अॅपची लिंक व या अॅपवर महापालिकेच्या अॅपची लिंक पाहायला मिळणार आहे.

या अॅपच्या माध्यमातून मुंबईकरांना एक चांगली सुविधा मिळणार असून कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेता हे अॅप उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांना इतरत्र कुठेही धावपळ न करता या अॅपच्या माध्यमातून रुग्णालयातील व्हेंटिलेटर व आयसीयू बेडची सद्यस्थिती नागरिकांना कळणा आहे. यामुळे नागरिकांचा अमुल्य वेळ वाचणार आहे.

नागरिकांनी गूगल – प्ले स्टोरवरून हे अॅप विनामूल्य डाउनलोड करून घ्यावे,असे आवाहन यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.जेणेकरून कोरानाच्या काळात मुंबईकर नागरिकांच्या हिताचे दृष्टीने ते सोयीचे होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या अॅपची निर्मिती शंतनू कुलकर्णी, असलम शेख,निखिल दळवी आदींनी केली आहे.


ठाण्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत लपवालपवी 
First Published on: June 17, 2020 8:23 PM
Exit mobile version