आता रूग्णांना ऑनलाईन पद्धतीने मिळणार वैद्यकीय सल्ला, वोक्हार्डचा नवा उपक्रम

आता रूग्णांना ऑनलाईन पद्धतीने मिळणार वैद्यकीय सल्ला, वोक्हार्डचा नवा उपक्रम

वोक्हार्ड हॉस्पिटल

करोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचेही आवाहन सरकारद्वारे वारंवार केले जात आहे. पण, वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास प्रवास करण्याची मुभासुद्धा देण्यात आली आहे. परंतू भितीमुळे अनेक जण वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांकडे जाणे टाळत असल्याचे दिसून येत आहेत. हे लक्षात घेऊन नागरिकांचा प्रवास टाळण्यासाठी मीरा रोडच्या वोक्हार्ड हॉस्पिटलने खास रूग्णांसाठी नवा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे आता सर्वसामान्य रूग्णांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला मिळणार आहे.

हेही वाचा – …आणि वडिलांचा मृतदेह दुचाकीवरुन नेण्याची आली वेळ

रूग्णांच्या हिताच्या दृष्टीने हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी न येता घरच्या घरी कशाप्रकारे वैद्यकीय उपचार दिले जाईल, याचा विचार केला. त्यानुसार आता रुग्णांना ऑनलाईन पद्धतीने डॉक्टरांचा घर बसल्या वैद्यकीय सल्ला देण्यात येणार आहे. शिवाय घरीच आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील.
– डॉ. पराग रिंदानी, केंद्र प्रमुख, वोक्हार्ड हॉस्पिटल

या आजारांवर मिळणार ऑनलाईन मार्गदर्शन 

करोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता संपूर्ण देशभरात २१ दिवस संचारबंदी लागू लागण्यात आली आहे. या कारणामुळे किरकोळ आजार किंवा नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे जाणे लोकं टाळत आहेत. हे पाहून मुंबई सेंट्रल आणि मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलने नवी योजना आखली आहे. याद्वारे मधुमेही, हृदयरोग, मूत्रपिंडाचा विकार किंवा अन्य आजारांच्या रूग्णांना हॉस्पिटलमधील बाह्यरूग्ण विभागात येण्याची गरज नाही. फक्त फोनद्वारे रूग्णांना डॉक्टरांशी संवाद साधता येणार आहे. या ऑनलाईन पद्धतीत डॉक्टर फक्त रूग्णाचा आजार जाणून घेऊन त्यावर काय उपचार केले पाहिजेत हा सल्ला देतील.

ऑनलाईन वैद्यकीय सल्ल्यासाठी दूरध्वनी क्रमांक 

First Published on: March 27, 2020 11:07 PM
Exit mobile version