भिवंडीत अपघात; दुचाकीस्वार ठार, दोघे जखमी

भिवंडीत अपघात; दुचाकीस्वार ठार, दोघे जखमी

विक्रोळीत फुटपाथवर झोपलेल्यांना कंटेनरने चिरडले

कॉलेजला सुट्टी असल्याने गोदामात काम शोधण्यासाठी आलेल्या युवकांच्या दुचाकीला अपघात झाल्याने या अपघातात एक जण ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मोनिका हॉटेल, वळपाडा येथे ही घटना घडली आहे. मुरबाड येथे राहणारे अमोल मोतीराम हरड असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. तर या अपघातात अनिकेत तानाजी हरड (२३) आणि प्रणय गोल्हे (१९) हे गंभीर जखमी झाले आहेत.

असा घडला अपघात

सध्या कॉलेजला सुट्टी असल्याने हे तिघेही भिवंडीतील गोदामात नोकरी शोधण्यासाठी आले होते. मोटार सायकलने माणकोलीकडून अंजूरफाट्याकडे येत असताना वळपाडा येथे टाटा टेंपोने अचानक वळण घेत असल्याने त्याची धडक वाचवण्यासाठी मोटार सायकल चालक अमोल याने अर्जंट ब्रेक लावला असता दुचाकी रस्त्यावर पडली. त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनिकेत आणि प्रणय हे दोघे जखमी झाल्याने त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघात प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मारुती कारवार यांनी टेंपो चालक योगेश ज्ञानदेव गंडे (३४) यास रविवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.

First Published on: June 3, 2019 9:47 AM
Exit mobile version