पश्चिम रेल्वेवर आणखी एक एसी लोकल धावणार

पश्चिम रेल्वेवर आणखी एक एसी लोकल धावणार

AC LOCAL

पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर महिनाभरात आणखी एक एसी लोकल धावणार आहे. चेन्नईच्या रेल्वेच्या इंटीग्रल कोच कारखान्यात या एसी लोकलची बांधणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल दाखल झाली. मध्य रेल्वेची ही सहावी एसी लोकल आहे. त्यानंतर आता पश्चिम रेल्वेवर एसी लोकल वाढणार आहे. (one more ac local run on western railway line)

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सध्या सात एसी लोकल गाड्या आहेत. या सातपैकी चार एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत असून दोन गाड्या देखभाल दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये आहेत. यामध्ये आता आणखी एका एसी लोकलची तांत्रिक चाचणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. एसी लोकलची ही तांत्रिक चाचणी यशस्वी ठरल्यास या महिनाअखेरीस आठवी एसी लोकल मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली.

एसी लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आल्यानंतर त्या लोकलच्या काही चाचण्या केल्या जाणार आहेत. सध्या एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, ही आठवी एसी लोकल दाखल झाल्यास सामान्य लोकल रद्द केल्या जाणार आहेत. त्या लोकलच्या जागेवर ही एसी लोकल चालवली जाईल. परंतु, सामान्य लोकल रद्द केल्यास प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या दररोज ४० फेऱ्या होतात. प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे ५ मे पासून एसी लोकलच्या तिकीट दरात कपात करण्यात आली. त्यानंतर पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलला प्रवाशांचा काहीसा प्रतिसाद वाढू लागला.

तिकीट दरात कपात केल्यानंतर आकडेवारी

गेल्या काही महिन्यांपासून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पावसाळा संपताच पश्चिम रेल्वेकडून नव्याने दाखल होणारी एसी लोकल चालवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.


हेही वाचा – राज्यात स्वाइन फ्लूची १४२ जणांना लागण, ७ जणांचा मृत्यू

First Published on: July 23, 2022 6:52 PM
Exit mobile version