मासेमारी करणारी बोट पाण्यात बुडाली; एकजण बेपत्ता

मासेमारी करणारी बोट पाण्यात बुडाली; एकजण बेपत्ता

प्रातिनिधिक फोटो

आज सकाळी मासेमारीसाठी वसईच्या समुद्रात गेलेली एक बोट पाण्यात बुडाली. अर्नाळा ते डहाणूदरनम्यान मासेमारी करणाऱ्या या बोटीला हा अपघात झाला. या अपघातामध्ये बोटीवरील एक माणूस बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय अपघातग्रस्त बोटही अद्याप मिळालेली नाही. हा अपघात नेमका कशामुळे घडला याचं कारणही अद्याप समजू शकलेलं नाही. कोस्टल गार्ड पथकाला जेव्हा या घटनेची माहिती मिळाली त्यावेळी त्यांनी तात्काळ बोट बुडालेल्या ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, बोटीतील २ ते ३ मच्छिमार सुखरुप असून १ मच्छिमार बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली. मात्र, बोट समुद्रात नेमकी कुठे अाहे याचा शोध न लागल्यामुळे तसंच बचावलेल्या मच्छिमारांशी संपर्क तुटल्यामुळे कोस्टल गार्ड्सना बचावकार्यात अडथळा येत आहे. दरम्यान, या घटनेला १ ते २ तास उलटले असून, आतापर्यंत मच्छिमारांना मदत मिळाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 


वाचा: पुरुषाला नपुंसक म्हणणं ही त्याची बदनामी

First Published on: November 11, 2018 3:18 PM
Exit mobile version