वनरुपी क्लिनिक पुन्हा सुरू मात्र नशेखोरांचा त्रास कायम

वनरुपी क्लिनिक पुन्हा सुरू मात्र नशेखोरांचा त्रास कायम

मुंब्रावासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ हॉस्पीटल सुरू करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाच्या आजूबाजूला नशेखोरी करणार्‍यांचा वावर वाढल्याने वर्षभराभरापूर्वीच हॉस्पीटलला टाळे लागले होते. मात्र त्यानंतर हे वन रुपी क्लिनिक पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी नशेखोरांचा त्रास कमी झालेला नाही. अशी तक्रार दोन दिवसातच येथील डॉक्टर आनंद दराडे यांनी आपल्या वरिष्ठकडे केली आहे.

मुंब्रा स्थानकात वन रुपी क्लिनिक सुरू करण्यात आले होते. या क्लिनिकमधून बाळासाहेब ठाकरे जीवनदायी योजनेचा लाभही रुग्णांना घेता येणार आहे. नाक, घसा, हाड, हृदय, मेंदूच्या आजारांवरही या ठिकाणी उपचार केले जाणार आहेत. ज्या आजारांच्या प्राथमिक तपासणीसाठी 200 ते 500 रुपये फी आकारतात. मात्र या रुग्णालयात एक रुपयात प्राथमिक तपासणी आणि त्यावर स्वस्तात औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. रुग्णांना 24 तास सेवा प्रदान करणार्‍या रुग्णालयात एक डॉक्टर, एक कंपाउंडर आणि एक सहाय्यक असे तीन कर्मचारी रात्रीच्या वेळी कार्यरत असतात.

रेल्वेचा एक पोलीस, बिट मार्शलची गस्त
नशेखोरांचा त्रास बंद होण्यासाठी रेल्वे स्टेशनमास्तर यांनी एक रेल्वेचा पोलीस क्लिनिकवर तैनात करण्याची तयारी दाखविली आहे. तर मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी स्टेशन परिसरात गस्त घालणार्‍या बीटमार्शल्सची गस्त वाढविण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती शिवसेनेचे पदाधिकारी गिरीष शिलोत्री यांनी दिली.

First Published on: September 20, 2019 1:37 AM
Exit mobile version