Mumbai Corona: चिंता वाढतेय! मुंबईतील १ हजार इमारती अन् ११ हजार मजले सील

Mumbai Corona: चिंता वाढतेय! मुंबईतील १ हजार इमारती अन् ११ हजार मजले सील

Mumbai Corona: चिंता वाढतेय! मुंबईतील १ हजार इमारती अन् ११ हजार मजले सील

राजयासह मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. तर दुसरीकडे महापालिका देखील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेअंतर्गत आता महापालिकेने आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, मुंबईत कोरोनाचा दिवसेंदिवस उद्रेक होताना दिसत आहे. मुंबईत आतापर्यंत १ हजार इमारती आणि ११ हजार इमारतीचे मजले सील करण्यात आले आहेत.

मुंबईतील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास १ हजार इमारतींना टाळे लावण्यात आले आहे. तर ११ हजार इमारींमधील मजले सील करण्यात आले आहे. ज्या इमारतींच्या मजल्यावर दोनपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून आले आहेत आणि संपूर्ण इमारतीत पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत, अशा इमारती सील करण्याचा नियम महापालिकेने लागू केला आहे.

झोपडपट्ट्या, चाळींमध्ये ९० कन्टेन्मेंट झोन

दरम्यान, मुंबईत आता इमारतींप्रमाणे झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये देखील ९० कंटेन्मेंट झोन असल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे आता मुंबईत २१ लाख मुंबईकर नियमांच्या कचाट्यात अडकले आहेत. यामध्ये ग्रँड रोड, मलबार हिल, अंधेरी, कांदिवली, भायखळा, कुर्ला या भागातील सर्वात अधिक इमारतींना सील करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईची रुग्णसंख्या १० हजारांच्या उंबरठ्यावर पोहचली होती. मात्र, आज रुग्णसंख्या कमी झाली आहे. मुंबईत आज ८ हजार २१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत नोंद करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ५ लाख ५३ हजार १५९ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासात मुंबईत १० हजार ९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचप्रमाणे ४९ जण कोरोनामुळे दगावले आहेत. तर ४५ हजार ४८६ इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – Ratnagiri Curfew: रत्नागिरीत अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने बंद


 

First Published on: April 16, 2021 4:11 PM
Exit mobile version