काँग्रेसचा सायकल मोर्चा हा निव्वळ मीडिया इव्हेंट – फडणवीस

काँग्रेसचा सायकल मोर्चा हा निव्वळ मीडिया इव्हेंट – फडणवीस

नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसचं झालेलं आंदोलन हे कदाचित राज्य सरकारच्या टॅक्सविरोधातील आंदोलन असावं. यासह २७ रूपयांचा टॅक्स त्यांनी कमी करावा, गुजरातसह इतर राज्यांप्रमाणे किमान १० रूपयांनी पेट्रोल आणि डिझेल अधिक स्वस्त करावं, या करता हे आंदोलन असण्याची शक्यता असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. विधानभवन परिसरातून पत्रकारांशी संवाद साधताना ते असेही म्हणाले की, यंदाच्या अर्थसंकल्पात अजित पवार दोन-तीन रूपयांनी पेट्रोल-डिझेल किंमत कमी करून सेस कमी करणार असल्याचीही चर्चा सुरू होती. मात्र यापूर्वीच त्याचे श्रेय घेण्याकरता त्या आधीच अशा प्रकारचा सायकल मोर्चा, सायकल रॅली काढून त्यांनी हे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात काढण्यात आलेला हा मोर्चा किंवा सायकल रॅली पूर्णतः मीडिया इव्हेंट असून तो फार्स आहे, असेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. देशातील सर्वाधिक पेट्रोलचे भाव असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. केंद्र सरकारचा एकूण टॅक्स ३२ रुपये आहे. राज्य सरकारनं २७ रुपये टॅक्स पेट्रोलवर लावला आहे. नाना पटोलेंचे आंदोलन राज्य सरकारविरोधात असावं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

राज्यात काँग्रेसची अवस्था वाईट आहे, काँग्रेसचा सायकल मोर्चा हा मीडिया इवेंट, २७ रुपये पेट्रोल आणि डिझेलवर त्याठिकाणी लावलेला आहे, केंद्र सरकारचा एकूण ३३ रुपये त्याच्यामध्ये चार रुपये हे कृषी चार रुपये कमिशन आहे, उर्वरित हे पैशात त्यातले ४२ टक्के पैसे केंद्र सरकारकडे येतात येथे राज्याला परत करताना राज्य सरकारने मात्र २७ रुपये पेट्रोलवर लावलेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की नाना पटोले पश्चाताप समृद्ध असावं किंवा २७ रुपयाचा टॅक्स कमीत कमी करावा आणि दुसरा क्रमांक किंवा इतर राज्यांप्रमाणे किमान दहा रुपये हे पेट्रोल डिझेल स्वस्त करावं, यासाठी हे आंदोलन असावं, असेही म्हणत फडणवीसांनी टोला लगावला आहे.  तसेच, काँग्रेसला विरोधी पक्षांची जागा घेता येणार नाही. देशात काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे, अशा अवस्थेत मीडिया इवेंट ते करत आहेत. वीज बिलाचा मुद्दा महत्वाचा आहे. वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम राज्यात यापूर्वी कधी झाली नसल्याचेही त्यांनी आवर्जून यावेळी म्हटलयाचे दिसले.


First Published on: March 1, 2021 12:09 PM
Exit mobile version