तळागाळातील घटकांना ताकद देणे, मदत करणे हे आमचे सर्वांचे कर्तव्य – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

तळागाळातील घटकांना ताकद देणे, मदत करणे हे आमचे सर्वांचे कर्तव्य – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

Opposition Leader Pravin Darekar Blesses 25 Tribal Couples Attending Community Wedding Ceremony

पक्ष कोणताही असला तरी गोरगरिबांची सेवा करणे, तळागाळातील समाजाच्या उन्नतीसाठी काम करणे हे मानवजातीचे परमकर्तव्य आहे. त्यांना ताकद देणे, मदत करणे हे आमचे सर्वांचे कर्तव्य आहे. या कर्तव्याच्या भावनेतून मी या सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहिलो, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले.

श्री भागवत परिवार मुंबई आणि श्री ताडकेश्वर गौसेवा ट्रस्ट यांच्या वतीने ठाकूर व्हीलेज मुंबई येथे २५ आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा ताडकेश्वर महादेव गौशाळा, जानुपाडाजवळ, ठाकूर व्हीलेज, कांदिवली (पूर्व) येथे रविवारी पार पडला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून वधूवरांस शुभाशीर्वाद दिले आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, त्याप्रसंगी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या पवित्र सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी आदिवासी भागातील गरीब आणि विवाहेच्छुक तरुणांचा विवाह करून देण्याचे पवित्र कार्य करण्यासाठी सगळ्यांचे अभिनंदन. या मोहिमेसाठी माझी काही मदत लागल्यास मी त्यासाठी कायम तयार आहे. या विवाह झालेल्या तरुणांना पुढील आयुष्यासाठी काही सहकार्य लागल्यास त्यासाठी मी तयार आहे, असे दरेकर यांनी सांगितले.

याप्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, विरेन्द्र याग्निक, सत्यप्रकाश गोयल, एसीपी संजय पाटील, त्यागीजी, राहुल टांगरी. निशा परुळेकर, सुनील सिंघल. दिलीप उपाध्याय, लकी यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

First Published on: May 22, 2022 10:38 PM
Exit mobile version