एक धाव पाण्यासाठी…

एक धाव पाण्यासाठी…

Ulave marathon

रविवारी १० फेब्रुवारी रोजी रवी पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून बामणडोंगरी रेल्वे स्थानकाजवळील उलवे नोडजवळ मॅरेथॉनसह विविध उपक्रमांनी जन्मदिन साजरा करण्यात आला. यावेळी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, आमदार विवेक पाटील, शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील, कार्यकर्त्या माधुरी गोसावी, पत्रकार माधव पाटील, पनवेल जिल्हा चिटणीस गणेश कडू आदींसह मान्यवर उपस्थित होते.

कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकेडमीचे उपाध्यक्ष, साई संस्थान वहाळचे संस्थापक अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ उलवेचे अध्यक्ष रवी पाटील यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने उलवे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. “पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी, एक धाव पाणी बचतीसाठी” अशी संकल्पना घेत मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. यावेळी २० हजारहून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या मॅरेथॉनचे आयोजन रोटरी क्लब ऑफ उलवे नोड आणि रवीशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. मॅरेथॉनचे लाईव्हच्या माध्यमातून राज्यभरात प्रदर्शन करण्यात आले होते. स्वप्नांचे शिल्पकार म्हणवणार्‍या सिडको कडून या मॅरेथॉन आयोजनात भरीव सहकार्य लाभले आहे.

यावेळी मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या खुल्या गटासाठी १० किमी तर महिलांच्या खुल्या गटासाठी ८ किमीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक, ३१ ते ५० वर्षे वयोगटातील हौशी स्पर्धक, फॅन्सी ड्रेसची ड्रीम रन, पोलीस बांधवांसाठी ५ किमीची ड्रीम रन अशा वेगवेगळ्या इव्हेंट्समुळे ही मॅरेथॉन सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. ९ फेब्रुवारी रोजी महिलांच्या जिल्हा स्तरीय कबड्डी आणि कुस्तीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वाढदिवसाच्या पूर्व संध्येला रायगड सुंदरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. केअर फॉर नेचर आणि रोटरी क्लब ऑफ सनराईज यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा संपन्न होणार असून अलिबाग वेश्वी येथे जिल्हास्तरीय खो खो आणि कराटे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी दुपारच्या सत्रात साई मंदिर वहाळ येथे कर्करोगाने ग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर संध्याकाळी ७ वाजता तरघर येथे आर के ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले. प्रकाश झोतात खेळली जाणारी चार दिवसीय या क्रिकेट स्पर्धेची सुरुवात यानिमित्ताने करण्यात आली.

First Published on: February 12, 2019 5:27 AM
Exit mobile version