मुंबई पालिकेच्या ‘या’ ५ रुग्णालयात येत्या आठवड्यात ऑक्सिजन प्लांट होणार सुरू

मुंबई पालिकेच्या ‘या’ ५ रुग्णालयात येत्या आठवड्यात ऑक्सिजन प्लांट होणार सुरू

पालिकेच्या पाच रुग्णालयात ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प, रोज मिळणार ६.९३ मेट्रिक टन ऑक्सिजन

मुंबई महापालिकेच्या कूपर, राजावाडी, भाभा (वांद्रे), भगवती आणि कस्तुरबा या ५ रुग्णालयात पुढील आठवड्यात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येणार आहेत. तसेच, आणखीन १६ ठिकाणीही लवकरच ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचे नियोजन असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी ही सुविधा उपयुक्त व सोयीस्कर ठरणार आहे.

मध्यंतरी मुंबईसह राज्यातील रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी विशेषतः ज्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो अशा रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यामुळे परराज्यामधून ऑक्सिजन आयात करण्यात आला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, मुंबई महापालिकेसह शासनाने स्वतःचे ऑक्सिजन प्लांट निर्माण करून रुग्णांना दिलासा देण्याबाबत आवाहन केले होते.त्यानुसार, मुंबई महापालिकेनेही पूर्व तयारी केली.

पुढील आठवड्यात पालिकेच्या कूपर, कस्तुरबा, राजावाडी,भाभा (वांद्रे) व भगवती या ५ रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात येणार आहे. सध्या या ५ रुग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेने स्वतःचे पैसे खर्च न करता सीएसआर फंडामधून ह्या प्लांटचा खर्च भागविण्याचे नियोजन केले आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी, या ऑक्सिजन प्लांटच्या कामांबाबत पालिकेकडून आढावा घेतल्याचे सूत्रांकडून समजते.

५ रुग्णालयातील प्लांट, क्षमता

First Published on: June 4, 2021 10:50 PM
Exit mobile version