कॅन्सरच्या उपचारासाठी वेदनारहित ‘केमो’

कॅन्सरच्या उपचारासाठी वेदनारहित ‘केमो’

iit recruitment 2021 : लॉटरी लागली! आयआयटीमध्ये १२ विद्यार्थ्यांना १ कोटींचे पॅकेज

कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर उपचार करताना केमोथेरपीत रुग्णांना असह्य वेदना होतात. या वेदनांतून रुग्णांची लवकरच सुटका होणार आहे. आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी हे नवे संशोधन केले असून नॅनोथेरपीच्या माध्यमातून हे संशोधन करण्यात आले आहे. या नवसंशोधनाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. या संशोधनात कॅन्सरवर यशस्वी उपचार केले जाणार आहेत. आयआयटीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ रिंती बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन पूर्ण करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपरमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

कॅन्सरवर उपचार करताना शरीरातील पेशी मारण्यासाठी केमॉथॅरेपीचा वापर केला जातो. उपचाराची ही पध्दत अत्यंत वेदनादायक असल्याने अनेकांकडून अर्ध्यावर उपचार सोडला जातो. त्यामुळे रुग्णांची होणारी फरफट थांबविण्यासाठी आयआयटी शास्त्रज्ञांनी हे संशोधन करण्याचे निश्चित केले होते. आयआयटी मुंबईच्या बायोसायन्सेस ऍण्ड बायोइंजिनीयरिंग विभागातील शास्त्रज्ञांनी कर्करोगावर नॅनोथेरपी विकसित केली आहे. या थॅरेपीत आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञांनी एक उपकरण बनवले आहे ज्यातून दोन सूक्ष्म फुगे रुग्णाच्या रक्तवाहिनीत सोडले जातात. यातील एका फुग्यामध्ये केमोथेरपीची औषधे असतात तर दुसरा गॅसचा फुगा पहिल्याला टयूमरपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. त्यामुळे रुग्णाच्या चांगल्या पेशींना धक्का लागत नाही. कॅमो करताना होणार्‍या वेदना या थॅरेपीच्या वेळी होत नसल्याचे या संशोधनातून समोर आल्या आहेत.

हे संशोधन करताना आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेत तयार केलेल्या प्रयोग पेशी (इन-विट्रो) तसेच प्राणी (इन-व्हिवो) या दोन्हीवरचा प्रयोग ही यशस्वी झाला आहे. त्यामधून केमोथेरपीच्या औषधांचा थेट टयूमरवर हल्ला करता येतो. केमोथेरपीत कर्करोगाच्या पेशींबरोबरच शरीरातील चांगल्या पेशीही मारल्या जातात. नॅनो बबल्सद्वारे केमोथेरपी दिल्याने रुग्णाची कर्करोगातून बचावण्याची शक्यताही शंभर टक्के वाढते असे प्रयोगाच्या शेवटी दिसून आले आहे. केमोथेरेपीमध्ये वापरण्यात येणार्‍या नॅनोथेरपीतील औषधाचा फुगा २०० नॅनोमीटर तर गॅसचा फुगा हा ५०० नॅनोमीटर आकाराचा असतो. पहिल्या फुग्याला नॅनोकॅप्सुल तर दुसर्‍या फुग्याला नॅनोबबल म्हटले गेले आहे.

अल्ट्रासाऊंडद्वारेच कर्करोगाच्या गाठींचा वेध घेत हे फुगे तिथपर्यंत पोहोचवले जातात. गाठीपर्यंत फुगे पोहोचले की गॅसचा फुगा फुटतो आणि त्यामुळे औषधांच्या फुग्याला गाठींमध्ये प्रवेश करण्यासाठी मार्ग बनतो. या प्रक्रियेला यूएसजी गायडेड कॅन्सर थेरपी असेही म्हटले जाते. औषधांचा थेट कर्करोगाच्या पेशींवरच हल्ला व्हावा आणि इतर चांगल्या पेशी सुरक्षित राहाव्यात यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ रात्रंदिवस संशोधन करत आहेत.

First Published on: November 13, 2018 5:46 AM
Exit mobile version