पंचवटी एक्सप्रेसचे २ डबे राहिले मागे; मध्य रेल्वे विस्कळीत

पंचवटी एक्सप्रेसचे २ डबे राहिले मागे; मध्य रेल्वे विस्कळीत

पंचवटी एक्सप्रेसचे डबे मागे

मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरु. अडीच तासानंतर पंचवटी एक्सप्रेस रवाना.


मनमाड – मुंबई – पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटल्याने एक्सप्रेसचे अर्धे डब्बे मागे राहून अर्धे डब्बे पुढे गेल्याच प्रकार आज, गुरुवारी सकाळी कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानक दरम्यान घडला. ऐन सकाळच्या वेळी हा प्रकार घडल्याने जलद मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने त्याचा धीम्या मार्गावरही परिणाम झाला होता.

सर्व गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या 

मनमाडहून मुंबईला जाणारी पंचवटी एक्सप्रेसने कल्याण रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावरच पत्री पुलाजवळ येताच अचानक एक्सप्रेसचे कपलिंग तूटल्याचा प्रकार घडला. त्यामुळे इंजीनसह २ डब्बे पुढे गेले आणि उर्वरित डब्बे पाठीमागे राहिले. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. दरम्यान, हा प्रकार मोटरमनच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने गाडी थांबवली. या प्रकारामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. परिणामी जलद मार्गावरील लोकल धिम्या गतीने जाणाऱ्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

 

 

First Published on: March 7, 2019 11:27 AM
Exit mobile version