पाणीपुरी ठरतेय जनतेच्या आरोग्यास घातक

पाणीपुरी ठरतेय जनतेच्या आरोग्यास घातक

(फोटो प्रातिनिधिक आहे)

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

सध्या पाणीपुरीतील पुरी बनवण्याचा उद्योग वादात सापडला आहे. या पुऱ्या बनवताना वापरण्यात येणारे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असते. त्यामुळे पाणीपुरी आता नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणारा प्रकार बनला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने दहिसरमधील कांदळपाडा येथील ओम साई फूड या कारखान्यावर धाड टाकली, तेव्हा ही धक्कादायक माहिती समोर आली.
या ठिकाणी बनवणाऱ्या येणाऱ्या पुऱ्या अशुद्ध तेलात तळल्या जात होत्या, तसेच पुरीसाठी वापरण्यात येणाèया साहित्यांची मुदतही संपलेली होती. तसेच येथे प्रचंड अस्वच्छता होती, ज्यामुळे या ठिकाणी बनवण्यात येणाèया पुèया आरोग्यासाठी निश्चितच घातक ठरत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

साहित्य जप्त

सर्व नियम धाब्यावर बसवून याठिकाणी हा उद्योग सुरू होता. या कारखान्याला परवानगी नसल्याचेही समोर आले. अन्न व औषध प्रशासनाला या प्रकाराची माहिती मिळताच कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात एकूण ५६ हजार १७२ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच, हे सर्व पदार्थ तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त शैलेंद्र आढाव यांनी दिली.

First Published on: May 26, 2018 6:39 AM
Exit mobile version