मेट्रो १ मध्ये प्लास्टिक टोकनऐवजी ‘पेपर क्यूआर तिकीट’ मिळणार!

मेट्रो १ मध्ये प्लास्टिक टोकनऐवजी ‘पेपर क्यूआर तिकीट’ मिळणार!

Mumbai Metro : मुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत; तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा

‘ग्रो ग्रीन’  उपक्रमांतर्गत घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो १ मार्गावर गेल्या महिन्यापासून प्रवाशांना प्लास्टिक टोकनऐवजी ‘पेपर क्यूआर तिकीट’ देण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली. मात्र, अलीकडे प्रवाशांना देण्यात येणारे प्लास्टिक टोकन गहाळ होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे प्रशासनाकडून ही शक्कल लढविण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरदिवशी सुमारे साडेतीन हजार टोकन गहाळामुळे मेट्रो १ प्रशासनाला प्रतिमहिना अंदाजे २५ लाखाहून अधिक रूपयांचा फटका बसत होता. त्यामुळे प्लास्टिक टोकन गहाळ होण्यापासून होणारे नुकसान आता प्रशासनाला टाळता येणार आहे.

परतीच्या प्रवासासाठी दिलेल्या दोन टोकनपैकी एकल प्रवासात एक टोकन परत न करणे, एकाच टोकनमधून दोन जणांनी बाहेर पडणे, याप्रकरणांमुळे एका दिवसांत तीन ते साडेतीन हजार टोकन गहाळ होत असल्याचे समोर आले आहे. सुमारे साडेपाच वर्षात मुंबई मेट्रो १ने तब्बल ६३० दशलक्षाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. प्रतिदिन साडेचार लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतात. यामध्ये २.३ लाख प्रवासी पासधारक असल्याने उर्वरित प्रवाशांना टोकन दिले जात होते.

एका प्लास्टिक टोकनची किंमत जवळपास २० ते २५ रूपये असून, महिन्याभरात मेट्रो १ प्रशासनाचा अंदाजे २५ ते २६ लाख रूपयांचा फटका बसत असे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. सद्यस्थितीला पेपर क्यूआर तिकिटासोबत उपलब्ध टोकनचा वापर करण्यात येत आहे. प्रवाशांना नव्या सुविधेची सवय होईपर्यंत टोकन सुविधा कायमची बंद करण्यात येणार आहे. मेट्रोतर्फे ग्रीन गो उपक्रम सुरू आहे. दुप्पट वेगाने तिकिटांचे व्यवहार सक्षम करणारी पेपर क्यूआर तिकीट यंत्रणा देणारी मेट्रो १ ही मुंबईतील पहिली सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. आम्ही प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करत असून ग्रीन गो उपक्रमाचा एक भाग आहे, अशी माहिती मेट्रो १ च्या अधिकाऱ्याने दिली.


हेही वाचा – मेट्रो प्रवाशांनो ! आता स्टेशन ते ऑफिस करा सायकलने प्रवास

टोकन गहाळ प्रकरणाल बसणार लगाम

प्रशासनाने बँक कॉम्बो कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, लॉयल्टी प्रोग्राम, तात्काळ कॅशबॅक आदी टेक्नोसॅव्ही सोयी याआधी ग्राहकांना देण्यास सुरूवात केली होती. आता याच धर्तीवर ‘पेपर क्यूआर तिकीट’ ही सुविधा तत्काळ अंमलात आणत टोकन गहाळ प्रकरणाला लगाम घालण्यात आला आहे.

पेपर क्यूआर तिकिटाचा हा फायदा!

* दुप्पट वेगाने तिकीट देणे होणार शक्य
* थर्मल प्रिंटर्स शाईविरहीत
* थर्मल पेपरवर तिकिटांची छपाई वेगवान आणि उच्च दर्जाची
* टोकन गहाळ होणाऱ्या नुकसानावर आळा बसणार

क्यूआर तिकिटाचा असा वापर करा…

सुरक्षा तपासणीनंतर एएफसीच्या (ऑटोमेटेड फेअर कलेक्शन) वर लावलेल्या काचेवर तिकिटावरील क्यूआर कोड स्कॅन करावा. तसेच प्रवाशांनी बाहेर पडताना स्कॅन करण्यासाठी तिकीट जवळ ठेवावे. गंतव्य स्थानकावर प्रवाशांना बाहेर पडताना एएफसी गेटवर तोच क्यूआर पुन्हा स्कॅन करावा लागेल.


हेही वाचा – मेट्रो २ बच्या कामाला गती मिळणार
First Published on: March 3, 2020 12:20 PM
Exit mobile version