गोरखपूर एक्स्प्रेसच्या पेंटाग्राफला मुंब्याजवळ आग

गोरखपूर एक्स्प्रेसच्या पेंटाग्राफला मुंब्याजवळ आग

वांद्रे लोकमान्य टिळक टर्मिनसहून गोरखपूरकडे निघालेल्या गोरखपूर एक्स्प्रेसच्या पेंटाग्राफला रविवारी दुपारी पावणे वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने ही गाडी मुंब्याजवळ थांबवण्यात आली. त्यामुळे डाऊन दिशेकडील मार्गावरील वाहतुकीचा सकाळच्या वेळेत खोळंबा झाला. रविवारी मुंबईकडे जाणार्‍या किंवा डाऊन दिशेकडीलही प्रवाशांची संख्या कमी होती. त्यामुळे रोजच्या तुलनेत कमी संख्येने असलेल्या प्रवाशांचे हाल झाले.

रविवारी मेगाब्लॉक असल्यामुळे गाड्यांचे वेळापत्रक रेंगाळणार हे माहीत असल्याने प्रवासी महत्त्वाच्या कामाशिवाय लोकलने प्रवास करत नाहीत. रविवारी चाकरमान्यांची गर्दी कमी असल्याने लोकलमध्ये कुटुंबांनी प्रवास करणार्‍यांची गर्दी असते. अशा प्रवाशांना या गोंधळाचा फटका बसला. आगीमुळे गोरखपूर एक्स्प्रेसच्या जनरेटरमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल गाड्यांचा खोळंबा झाला होता. अर्ध्या तासाने बिघाड दुरुस्त केल्यानंतर ही गाडी गोरखपूरकडे पुढे रवाना करण्यात आली.

First Published on: February 10, 2020 5:40 AM
Exit mobile version