मुंबई धुरकटली, आता लक्ष द्यावंच लागेल!

मुंबई धुरकटली, आता लक्ष द्यावंच लागेल!

मुंबईच्या हवामानात धुलिकण वाढले

मुंबईच्या वातावरणातील एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. मुंबईच्या हवेमध्ये धुलिकणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ‘सफर’ या संकेतस्थळाने धुलिकणांविषयी ही माहिती दिली आहे. हे संकेतस्थळ धुलिकणांचा आढावा घेत असते. मुंबईमध्ये प्रदुषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मुंबईत हवेचे वाढते प्रदुषण ही एक गंभीर समस्या झाली असून त्याचाच परिणाम आता हळूहळू जाणवू लागला आहे.

३२२ वर पोहोचले धुलिकण

‘सफर’ संकेतस्थळाने दिलेल्या अहवालानुसार मुंबईमध्ये धुलिकणांचे प्रमाण ३२२ वर पोहोचले आहे. धुलिकणांचे हे प्रमाण आरोग्यास अत्यंत हानिकारक आहे. शिवाय, झाडे तोडल्यामुळे धुलिकणांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी झाडे लावण्याचे आवाहन केले आहे. ‘सफर’ने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील वरळीमध्ये सर्वात जास्त धुलिकणांचे प्रमाण आढळले आहे. ते प्रमाण ३२२वर पोहोचले आहे. त्या खालोखाल अंधेरी (१९४), वांद्रे-कुर्ला संकुल (१६९), बोरीवली (११३), माझगाव (१०९), भांडुप (९३), चेंबूर (७६), मालाड (७४), कुलाबा (७४), नवी मुंबई (१७८) या भागांमधील हवेची गुणवत्ता ढासळल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे झाडे लावूण वातावरण संतुलित करण्याचे आवाहन पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आहे.

तर, होऊ शकतात अपघात

हवेमधील धुलिकणांचे प्रमाण जर असेच वाढत राहिले तर पश्चिम आणि पूर्व महामार्गावर वाहन चालवणं कठीण होणार आहे. त्यामुळे या धुलिकणांचे प्रमाण अजून वाढले तर गाडी चालवताना अपघात होऊ शकतात. वाढत्या प्रदुषणामुळे उंच इमारती धुलिकणांमध्ये गायब होऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर श्वसनालाही या धुलिकणांचा त्रास होतो. या धुलिकणांमुळे श्वसनाचे विविध विकार उद्भवू शकतात. त्यामुळे यावर वेळीच लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

First Published on: October 5, 2018 12:00 PM
Exit mobile version