धारावीत पुन्हा रुग्ण वाढले; दिवसभरात आढळले ४१ रुग्ण

धारावीत पुन्हा रुग्ण वाढले; दिवसभरात आढळले ४१ रुग्ण

धारावीत दिवसभरात ४१ रुग्ण आढळून आले आहेत. या मागील दोन दिवसांपूर्वी रुग्णांची संख्या १८ आणि त्यानंतर गुरुवारी ही संख्या दुप्पट होवून ३८ वर पोहोचली होती. परंतु शुक्रवारी ही संख्या ४१वर पोहोचल्याने धारावीतील एकूण बाधित रुग्णांची संख्या १७१५ वर पोहोचली आहे.

धारावीत २९ एप्रिलला माटुंगा लेबर कॅम्पमध्ये पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर २९ मे रोजी या विभागात आतापर्यंत बाधित रुग्णांचा आकडा १७५च्या आसपास पोहोचला आहे. या विभागात ३ मेपासून सलग सरासरी ५ ते ७ रुग्ण आढळून येत आहे. शुक्रवारीही या ठिकाणी आणखी सात रुग्णांची भर पडली आहे. तर शाहू नगर येथे ५ रुग्ण तर धारावी कुंभारवाडा येथे ४, काळा किल्ला व  ९० फुटी रस्ता  येथे प्रत्येकी तीन रुग्ण आढळून आले. याशिवाय होली मैदान, गुल मोहम्मद चाळ व महात्मा गांधी नगर, आझाद नगर परिसरात २ आणि शास्त्री नगर, सोशल नगर,फातमाबाई चाळ, अनाजी चाळ, बलिगा नगर, बॅक चाळ, वैभव सोसायटी, राजीव गांधी नगर, खांबदेव नगर, धारावी कोळीवाडा आदी ठिकाणी दिवसभरात ४१ रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १७१५ एवढी झाली आहे, तर मृतांचा आकडा ७० वर पोहोचला आहे.

तर माहिममधील एकूण रुग्णांची संख्या ४४३ एवढी झाली तर दादरची एकूण रुग्ण संख्या २९४ एवढी झाली आहे. याठिकाणी दोन्ही ठिकाणी अनुक्रमे मृतांची संख्या ९ व १० एवढी आहे.

जी-उत्तर विभागातील रुग्ण आणि मृतांची आकडेवारी

धारावी : एकूण रुग्णांची संख्या:  १७१५, मृत : ७०

माहिम : एकूण रुग्णांची संख्या:  ४४३, मृत :  ०९

दादर : एकूण रुग्णांची संख्या :  २९४, मृत :  १०

First Published on: May 29, 2020 9:25 PM
Exit mobile version