पायल तडवी प्रकरण : विभागप्रमुख, युनिटप्रमुखांना क्लिन चिट

पायल तडवी प्रकरण : विभागप्रमुख, युनिटप्रमुखांना क्लिन चिट

डॉ. पायल तडवी

डॉ. पायल तडवी रॅगिंग आणि आत्महत्येप्रकरणी नायर हॉस्पिटलमधून निलंबित केलेल्या दोन प्रमुखांना क्लिन चिट देण्यात आली आहे. पण, यावर तडवी कुटुंबियाने नाराजी व्यक्त केली आहे. राज्य मानवी हक्क आयोगाने एकतर्फी निर्णय दिला असल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला आहे.

विभागप्रमुखांना क्लिन चिट

राज्य मानवी हक्क आयोगाने नायर हॉस्पिटलने निलंबित केलेल्या स्त्रीरोग विभागाच्या युनिट प्रमुख डॉ. चिंग ली आणि तत्कालीन विभागप्रमुख डॉ. एस. एस. शिरोडकर यांना क्लिन चिट दिली आहे. पण, हा निर्णय मानवी हक्क आयोगापुरताच मर्यादित असून समांतर सुरू असलेल्या खटल्यावर आडकाठी येणार नाही, असंही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्य मानवी हक्क आयोगाने स्वत: हून दखल घेत सहा महिन्यांपूर्वी डॉ. पायल तडवी प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. या तपासणीनुसार, पायलने तिच्या वरिष्ठ सहकाऱ्यांविरोधात केलेली तक्रार स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. एस. एस. शिरोडकर आणि युनिट प्रमुख डॉ.चिंग ली या दोघांनीही योग्य रितीने हाताळली असल्याचा निर्वाळा देत हे दोघेही या प्रकरणात दोषी नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

एकतर्फी निर्णय

नोव्हेंबर महिन्यात तिला त्रास होत असल्याचे तिच्या कुटुंबियांना समजले होते. पण, तरीही योग्य ती चौकशी केली गेली नसल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. तसंच, आयोगाचा निर्णय एकतर्फी असल्याचा दावाही पायलचे पती डॉ. सलमान तडवी यांनी केला आहे.

हेही वाचा – डिग्री विकणे आहे; हवी असल्यास संपर्क साधा!

First Published on: December 30, 2019 11:08 AM
Exit mobile version