लठ्ठपणा कमी करायला होतो चुकीच्या औषधांचा वापर

लठ्ठपणा कमी करायला होतो चुकीच्या औषधांचा वापर

LockDown: लठ्ठपणा कमी करायचाय तर घरातील ही कामं करा

सध्याच्या तरुणी फिगरमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतात. आपण कसे सुंदर दिसू याकडे बऱ्याच तरुणींचा कल असतो. माणसाचे वजन वाढणे सोपे असते परंतु ते कमी करणे फार अवघड असते. मात्र हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी बऱ्याच व्यक्ती कोणत्याही थराला जातात. अनेक व्यक्ती वजन कमी करण्यासाठी विवध चुकीच्या औषधांचा सर्रास वापर करत असल्याचे समोर आले आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये नकळत लागलेल्या चुकीच्या खाण्या -पिण्याच्या सवयींमुळे वजन भराभर वाढत जाते. हे एकदा का वजन वाढले का मग ते कमी करण्यासाठी अथक प्रयत्न सुरु होतात. या प्रयत्नांमध्ये अनेक नागरिक आर्थीक आणि शारीरिकदृष्ट्या अक्षरशः भरडले देखील जातात. बऱ्याच ठिकाणी नववर्षाची तयारी जोरदार सुरु असून नवीन वर्षांमध्ये अनेकजण वजन कमी करण्याचा निश्चय करतात आणि उत्साहाच्या भरात चुकीचे औषध अथवा उपचार घेतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी योग्य वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते. परंतु रेल्वे स्थानकात अथवा मोबाईलवर फेसबुक बघत असताना वजन कमी करणारी जाहिरात डोळ्यासमोर येते आणि अनेकजण या जाहिरातीत दाखविलेल्या आमिषाला सहज बळी पडतात. कधी कधी वजन कमी होण्याच्या नादात काही गंभीर आजार ओढवून घेतात.

बदलती जीनवशैली आणि नियमित व्यायाम न केल्यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे परंतु तीन महिन्यात अथवा दोन आठवड्यात वजन कमी करणारे कोणतीही वैद्यकीय उपचार अथवा औषधे भारतातच काय जगामध्ये उपलब्ध नाहीत. अशा फसव्या जाहिरातींना बळी पडून अनेक नागरिक आपल्या शरीराचे नुकसान करून घेतात. वजन कमी होत असल्याचा दावा करणाऱ्या या औषधांमध्ये अत्यंत घातक असे घटक असतात आणि हे जाणून घेण्यासाठी आजच्या शहरातील नागरिकांकडे वेळच नाही. या औषधांमध्ये सिबुरामीन, रिमोनाबेंट सारखे घटक द्रव्य असल्याचे आढळून आले आहे. सिबुट्रॉमीन हे औषध उच्च रक्तदाब, हृदयविकार असलेल्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांमध्ये वापरले जाते. तसेच रिबोनाबेंट या औषधावर अमेरिकेत बंदी आहे. लठ्ठपणामुळे वीसहून अधिक आजारांना आमंत्रण मिळते, असे सिद्ध झाले आहे, त्यामुळे लठ्ठ नागरिक आपला लठ्ठपणा कमी करण्यासाठी जाहिरातीला बळी पडून घातक औषधे खरेदी करतात. या औषधांमुळे फायद्यापेक्षा तोटेच अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. औषधांपेक्षा वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया सुरक्षित समजली जाते परंतु कमी वेळात आणि कमी पैशामध्ये उपचार घेण्याच्या भारतीयांच्या मानसिकतेमुळे त्यांना भविष्यात गंभीर आजाराला बळी देखील पडावे लागते.  – डॉ मनीष मोटवाणी, अपेक्स हॉस्पिटल समूहाचे मुख्य बॅरियाट्रिक शल्यचिकित्सक

First Published on: December 20, 2018 4:07 PM
Exit mobile version