आधारकार्ड दाखवा, मोतीबींदूचं ऑपरेशन मोफत करा

आधारकार्ड दाखवा, मोतीबींदूचं ऑपरेशन मोफत करा

परळच्या बच्चू अली हॉस्पिटलकडून मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया

राज्याला मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून यासंबंधी अनेक अभियानं राबवली जात आहेत.  परळच्या ‘बच्चु अली’ या डोळ्यांच्या हॉस्पिटलकडूनही असाच एक उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात सरकारी आणि खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात आली आहे. बच्चू अली हॉस्पिटलकडून मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये या उपक्रमाला सुरूवात झाली असून या योजनेतंर्गत आतापर्यंत १५० रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बच्चू अली हॉस्पिटलमधील वैद्यकीय समाजसेवक रोहित खुडे यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. खुडे यांनी सांगितल्यानुसार, ‘मोतिबिंदू झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, अनेकदा आर्थिक परिस्थितीत बिकट असल्याने अनेक रुग्ण शस्त्रक्रियेचा पर्याय निवडत नाही.

खुडे पुढे म्हणाले की, ‘याचाच विचार करून रुग्णांवर विनामुल्य मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्याची योजना सुरू केली आहे. मात्र, यासाठी आधारकार्ड बंधनकारक आहे. खासगी हॉस्पिटल्समध्ये मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी जवळपास ३० हजार रुपये लागतात. मात्र, ट्रस्टी हॉस्पिटलमध्ये आठ हजार रुपये खर्च येतो. तरीही काही रुग्णांना हा खर्चही परवडत नाही. अशा रुग्णांवर या उपक्रमामार्फत मोफत शस्त्रक्रिया केली जात आहे. त्यासाठी रुग्णांनी आधारकार्ड सोबत बाळगणं अत्यावश्यक आहे. आतापर्यंत १५० रुग्णांनी या मोफत शस्त्रक्रियेचा फायदा घेतला आहे.’


क्या बात : आता ‘ऑलिम्पिक’मध्ये असेल रोबोंचाही सहभाग

First Published on: March 19, 2019 7:05 PM
Exit mobile version