रस्ते खोदकामांनी नवी मुंबईकर हैराण

रस्ते खोदकामांनी नवी मुंबईकर हैराण

Road work

नवी मुंबईतील विविध विकासकामांतर्गत शहरात विविध ठिकाणी कामे सुरु असून त्याच दरम्यान अनेक ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत. हे खोदलेले रस्ते चुकीच्या पद्धतीने बुजवल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे वाहनांची कोंडी होत आहे.

शहरातील खोदकामांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. विविध कामांसाठी हे खोदकाम केले जाते. मात्र हे खड्डे वेळेत बुजवले गेले नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यात अनेक इमारतींच्या बाजूने रस्त्यावरील खड्डे खणले गेल्याने वार्‍यामुळे धूळ उडून याचा त्रास नागरिकांना होत आहे. हे खड्डे दुरुस्त करावेत, अशी मागणी वाढत चालली आहे. रस्ते दुरुस्त केल्यावर पुन्हा खोदकाम करायचे. त्यावर पुन्हा डांबरीकरण करायचे असा ढिसाळ कारभार शहरात सर्रास पाहायला मिळतो.

दुरुस्ती डांबरीकरण केलेला गुळगुळीत रस्ता अवघ्या काही दिवसांत गॅसलाईन अथवा काही कारणास्तव खोदला जातो. त्यामुळे नाहक नागरिकांना त्रास सोसावा लागतो. यामुळे करदात्या नागरिकांचा यामुळे पैसा वाया जात आहे. पालिकेने सध्या सायकल योजना शहरात आणली आहे. ही सायकल योजना अल्पवाधीतच नागरिकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळे नेरुळ, सीवूड्स व बेलापूर भागात अनेक तरुण, तरुणी व नागरिक या सायकल चालवताना दिसतात. त्यात पावसाळ्यानंतर दुरुस्त करण्यात आलेले अनेक रस्ते हे एमएसईबी व महानगर गॅसलाईनसाठी खोदलेले आहेत. त्यात हे खोदलेले खड्डे रस्त्याकडेला असल्याने बाईक व सायकलस्वारांना मात्र त्रासाला सामोरे जावे लागते. सीवूड्स दारावे व बेलापूर, नेरुळ, सानपाडा, जुईनगर, घणसोली, तुर्भे, कोपरखैरणे, वाशी, ऐरोली येथील कॉलनीतील रस्ते, तसेच गावांशेजारील रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले आहे. बर्‍याच दिवसांच्या कालावधीनंतरही या रस्त्यांची परिस्थिती अजूनही तशीच आहे.

ज्या कंत्राट दारांना विविध कामे देण्यात आली आहेत. त्याच कंत्राटदारांचे काम रस्ता होता तसा करून देण्याचे आहे. त्यामुळे लवकरच पुन्हा रस्ता आहे त्या स्थितीत दिसेल. आम्ही या रस्त्याची पाहणी केली असता संबंधित अधिकार्‍यांना तशा सूचना केल्या आहेत.
संजय तायडे, विभाग अधिकारी, नेरूळ

First Published on: February 6, 2019 5:03 AM
Exit mobile version