Coronavirus: कोरोना रुग्णाच्या मृतदेहाचे फक्त दहन; दफनविधी होणार नाही

Coronavirus: कोरोना रुग्णाच्या मृतदेहाचे फक्त दहन; दफनविधी होणार नाही

प्रातिनिधिक छायाचित्र

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे. यापुढे कोरोनाबाधित रुग्ण कोणत्याही धर्माचा असला तरी त्याचा मृतदेह जाळावा लागणार आहे. रुग्णाच्या धर्मात दफनविधी कार्य असले तरी ते करता येणार नाही. दफनविधी करताना कोरोनाचे संक्रमन होण्याची भीती असते, तर संक्रमन रोखण्यासाठी मृतदेह जाळणे हाच एकमेव पर्याय असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने देखील सांगितलेले आहे.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सांगितले की, कोरोना बाधित रुग्णांवर धर्माची चिंता न करता अंत्यसंस्कार केले जावेत. त्यांच्यावर दफनविधी करण्याची परवानगी मिळणार नाही. तर त्यांच्या मृतदेहावर अग्निसंस्कार केले जातील. तसेच अंत्यसंस्कारावेळी पाच पेक्षा जास्त लोकांनी उपस्थित राहू नये, अशी नवी नियमावली जाहीर केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देश काय आहेत?

कोरोनाची लागण रोखण्यासाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी WHO ने नियमावली जाहीर केलेली आहे. त्यानुसार मृतदेह आयसोलेशन रुममधून बाहेर काढल्यानंतर तो कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घेण्यात यावी असे सांगितले आहे. तसेच योग्य सुरक्षा उपकरणांसहीतच अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश WHO ने दिले आहेत.

तसेच मृतदेहाला एक जागेहून दुसऱ्या जागी नेताना मग त्याचे शवविच्छेदन का असेना? नेत असताना मृतदेह अभेद्य बॉडी बॅगेत असला पाहीजे. ज्यामुळे मृतदेहातून विषाणूचा प्रसार होणार नाही. ज्या व्यक्ती मृतदेह हाताळणार आहेत. त्यांना मोठ्या कफ वाले गाऊन आणि ग्लोज वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच हे गाऊन वॉटरफ्रूफ असावा अशीही अट घालण्यात आली आहे.

 

First Published on: March 30, 2020 9:13 PM
Exit mobile version