आणखी १२ पैशांनी महागले पेट्रोल!

आणखी १२ पैशांनी महागले पेट्रोल!

पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

पेट्रोल-डिझेलचे दरवाढीचे सत्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचे दर वाढत चालले आहे. आज पेट्रोल पुन्हा १२ पैशांनी महागले आहे. त्यामुळे मंगळवारी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९१ रुपये २० पैसे तर डिझेलचा दर प्रतिलिटर ७९ रुपये ८९ पर्यंत पोहोचला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या या सत्रामुळे जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय, या दरवाढीसाठी सरकार काही पाऊल उचलत नसल्यामुळे जनतेकडून सरकारवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुंबई मागोमाग पुण्यातही पेट्रोल महाग

महाराष्ट्रात मुंबई नंतर पुण्यात पेट्रोल-डिझेलची सर्वाधिक विक्री होते. त्यामुळे मुंबई खालोखाल पुण्यातही पेट्रोलचा भडका कायम आहे. मंगळवारी पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९० रुपये ९७ पैसे आणि डिझेलचा दर ७८ रुपये ४४ पैशांपर्यंत पोहोचला आहे. या इंधनाच्या दरवाढीचा भडका संपूर्ण महाराष्ट्राला लागला आहे. मंगळवारी राज्यातील औरंगाबाद शहरात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९१ रुपये ५९ पैसे आणि डिझेलचे दर ७९ रुपये आणि ०५ पैशांपर्यंत पोहोचला आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९२ रुपये ९६ पैशांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची उपराजधानी असल्याला नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९१ रुपये ६८ पैसे आणि डिझेलचा दर ८० रुपये ४१ पैशांपर्यंत पोहोचला आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल महाग झाले आहे. त्यासोबतच सातत्याने रुपयाची होणारी घसरण याचा परिणाम इंधन दरावर दिसून येत आहे. त्यामुळे सतत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. दिल्लीत मंगळवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८३ रुपये ८५ पैसे तर डिझेलचा दर प्रतिलिटर ७५ रुपये २५ पैशांवर पोहोचले आहे.

First Published on: October 2, 2018 12:58 PM
Exit mobile version