महापालिकेच्या निविदांमध्ये फायझर, कंपनीकडून मात्र नकार

महापालिकेच्या निविदांमध्ये फायझर, कंपनीकडून मात्र नकार

Corona Vaccine: फायझर

मुंबई महापालिकेने कोरोना लसीसाठी मागवलेल्या जागतिक निविदांमध्ये जगप्रसिद्ध फायझर कंपनीनेही निविदा पाठवल्या असल्याचा दावा महापालिका आयुक्त इकबाल सिंंह चहल यांनी केला होता. मात्र, फायझर कंपनीने त्याचा इन्कार करत आपण अशा कोणत्याही निविदा भरल्या नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच वृत्त इकोनॉमिक टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

फायझरने कंपनीने इकोनॉमिक्स टाईम्सला सांगितले की, फायझर कंपनी किंवा आमच्याशी संबंधित भारतासह जागतिक स्तरावर अन्य कोणालाही फायझर-बायोटेक कोविड१९ लसीची आयात, मार्केटिंग आणि वितरण करण्यासाठी नेमलेले नाही. फायझर कंपनी कोविड-१९ लसीचा पुरवठा फक्त केंद्र सरकार आणि सुप्रा नॅशनल ऑर्गनायझेशन्सलाच करते.

तत्पूर्वी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले होते की, कोरोना लसीसाठी महापालिकेने काढलेल्या जागतिक निविदांमध्ये मुंबईला लसी पुरवण्यासाठी ८ कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. त्यापैकी एक निविदा फायझर-अ‍ॅस्ट्राझेनिकाची असून सात स्पुटनिककडून आहेत. निविदा भरण्याचा कार्यकाळ एक आठवड्याने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे इतरही कंपन्यांना त्यांच्या निविदा भरता येतील. नव्याने येणार्‍या निविदांचेही स्वागत होईल.

पंजाब आणि दिल्ली सरकारनेही फायझर कंपनीकडून कोरोना लसी विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र फायझर कंपनीकडून त्यांना लसी विकण्यास स्पष्ट शब्दात नकार देण्यात आला. आम्ही फक्त केंद्र सरकारशी व्यवहार करतो. राज्य सरकारांशी नाही, असे फायझरकडून स्पष्ट करण्यात आले होते.

First Published on: May 26, 2021 11:56 PM
Exit mobile version