उफ्फ ये गर्मी… एप्रिलमध्येच ‘मे’सारखे तापणार; तापमानात वाढ होण्याचा IMD चा इशारा

उफ्फ ये गर्मी… एप्रिलमध्येच ‘मे’सारखे तापणार; तापमानात वाढ होण्याचा IMD चा इशारा

मुंबई : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झालेले असताना पुढील काही दिवसांत आणखी कडक ऊन पडण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) दर्शविली आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईशान्य भारतात हलका पाऊस पडत असला तरी एप्रिल महिन्यातच नागरिकांना मे महिन्याची उष्णता जाणवू शकते.

गेल्या काही दिवासांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हवामानात मोठा बदल झाला आहे. आता कडक उन्हाचा त्रास नागरिकांना व्हायला सुरूवात झाली आहे. हवामान विभागाने सांगितले की, या आठवड्यात तापमानात वाढ होणार असून नागरिकांना उष्णता जाणवू शकते. केरळसह ईशान्येकडील काही राज्ये वगळता भारताच्या बहुतांश भागात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

40 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमान
देशातील अनेक भागात सध्या कडक उन्ह आणि घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. परंतु आठवड्याभरात तापमानात वाढ होणार असल्यामुळे भारतातील बहुतांश भागांना उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. मध्य भारत आणि त्याच्या आसपासच्या भागात सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान अपेक्षित आहे, तर पश्चिम बंगाल आणि दक्षिण-पूर्व भारतासारख्या पूर्व भारतातील अनेक भागात तापमाना ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकतो.
ओडिशा, बिहार, झारखंड, गुजरात आणि गोवा या राज्यात तापमानात 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशातही तीव्र उष्णता जाणवू शकते, तर तेलंगणा आणि महाराष्ट्रातही तापमान वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये पुढील २-३ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला नाही.

या राज्यात पडणार पाऊस
पुढील २४ तासांत अरुणाचल प्रदेश आणि पूर्व आसामसारख्या ईशान्येकडील राज्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाच्या सरी पडू शकतात. केरळमध्ये पुढील ५ दिवस हलक्या पावसाची शक्यता असून १२ ठिकाणी हलक्या पावसासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पश्चिम राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेची पावसाची शक्यता आहे.

First Published on: April 11, 2023 10:49 AM
Exit mobile version