वर्षभरात प्लास्टिक जप्त करून ४ कोटी १३ लाख दंड वसूल

वर्षभरात प्लास्टिक जप्त करून ४ कोटी १३ लाख दंड वसूल

प्लास्टिक हे सर्वांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले होते. विघटन न होणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करून त्या कचऱ्यात टाकल्याने प्रदूषणात वाढ होत होती.मुंबईसह राज्यभरात प्लास्टिक पिशवी बंदी लागू झाल्यापासून मुंबईत आतापर्यंत ७६ हजार २८२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. २३ जून २०१८ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत केलेल्या कारवाईतून ४ कोटी १३ लाख ४० हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

मोहीमेकरिता २५० अधिकाऱ्यांची नियुक्ती; २३ पथके सज्ज

राज्य सरकारने वर्ष भरापूर्वी प्लास्टिक बंदी लागू केली. राज्यभरात प्लास्टिकचा होणारा दुष्परिणाम टाळण्यास २३ जून २०१८ रोजी प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली होती. या राज्य सरकारच्या आदेशानंतर पालिकेने कठोर कारवाई करत प्लास्टिक विरोधात जोरदार मोहीम हाती घेतली होती. यानुसार दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली. या मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी मुंबई मनपातर्फे २५० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच यासाठी २३ पथके सज्ज झाली आहे.

७६ हजार २८२ किलोचा प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

या कारवाई अंतर्गत २३ जून २०१८ ते १७ सप्टेंबर २०१९ या कालवधीत बाजार विभाग, दुकाने, परवाना विभाग यांच्यामाध्यमातून ७६ हजार २८२ किलोचा प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करून ४ कोटी १३ लाख ४० हजारांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती आस्थापने विभागाने दिली आहे.


ऑक्टोबरमध्ये ८ दिवस ‘ड्राय डे’ने तळीरामांची पंचायत
First Published on: September 25, 2019 9:56 AM
Exit mobile version