पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांचा ‘पोलीस बाप्पा’

पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांचा ‘पोलीस बाप्पा’

पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे घरी विराजमान झालेला बाप्पा

विलेपार्ले पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे हे त्यांच्या अनोख्या बाप्पामुळे चर्चेत आले आहेत. गेल्यावर्षीपासून त्यांनी अनोख्या बाप्पाची स्थापना करुन एक नवीन पायंडा सुरू केला आहे. त्यांच्याकडील गणेश मूर्ती पोलीस गणवेशातील आहे. अतिशय रुबाबदार असलेली ही मूर्ती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राजेंद्र काणे यांनी याआधी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी १५ स्पेशल चित्रफीतीसुद्धा तयार केल्या आहेत. २००२ च्या सलमान खानच्या हीट अ‍ॅण्ड रन प्रकरणाच्या तपासात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच यंदा काणे यांनी रसिकांना एक स्पेशल भेट दिलेली आहे. सुखकर्ता-दुखकर्ता या बाप्पाच्या आरतीऐवजी पोलीस गणवेशातील बाप्पा असल्याने ‘पोलीस दादा पोलीस दादा…’ हे नवे गाणे त्यांनी तयार केले आहे. काणे यांनी तयार केलेले हे गाणे भन्नाट आहे. या गाण्याला ढोलताशांचे संगीतसुद्धा देण्यात आले आहे. विलेपार्ले पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे काणे यांनी पोलीस गणवेशातील मूर्ती बनवून घेण्यासाठी खूप मूर्तीकार शोधले. गेेल्यावर्षी त्यांनी पोलीस वेषातील गणेशमूर्ती बनवून घेतली होती. ती मूर्ती उभी होती. यंदाच्या वर्षी पोलीस वेषातील ही गणेशमूर्ती खुर्चीत बसलेली आहे. जनता आणि पोलीस यांच्यात एक अनोखे नाते असते ते टिकवून ठेवण्यासाठी पोलीसरुपी बाप्पाची पूजा करण्याचा योग यावा, यासाठी हा उपक्रम सुरू केला असल्याचे काणे सांगतात.

First Published on: September 18, 2018 3:00 AM
Exit mobile version