तरुणीला आत्महत्येपासून पोलिसांनी वाचवले

तरुणीला आत्महत्येपासून पोलिसांनी वाचवले

बोगस डॉक्टर स्वप्ना पाटकरला अटक

जुलै महिन्यांपासून सुरु असलेल्या अश्लील संभाषणाच्या कॉल आणि मॅसेजने मानसिक तणावात असलेल्या एका तरुणीने आत्महत्येचा निर्णय घेतला, मात्र तिला तिच्या कुटुंबियांनी वेळीच पोलिसांकडे नेले, तिचे समुपदेशन करुन तिला मानसिक आधार देत या घटनेची गंभीर दखल घेत अवघ्या काही तासांत या तरुणीला त्रास देणार्‍या 21 वर्षांच्या तरुणीला सायबर सेल पोलिसांनी अटक केली. फे्ंरण्डस रिक्वेस्ट नाकारल्याने एकतर्फी प्रेमातून त्याने सदरचे कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्याला शुक्रवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पश्चिम उपनगरातील सांताक्रुज परिसरात शबाना (नावात बदल) ही 21 वर्षांची तरुणी तिच्या कुटुंबियांसोबत राहते. जुलै महिन्यांपासून तिला एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरुन सतत कॉल आणि मॅसेज येत होते. समोरील व्यक्ती तिच्याशी अश्लील संभाषण करुन तिला अर्वाच्य शाषेत शिवीगाळ करीत होता. सतत येणार्‍या कॉल आणि मॅसेजने शबाना ही प्रचंड मानसिक तणावात होती, त्यामुळे तिने तिचा मोबाईल क्रमांक बदलून नवीन क्रमांक घेतला होता. मात्र नवीन क्रमांक घेतल्यानंतरही तिला सतत कॉल आणि मॅसेज येत होते.

सोशल मिडीयावर तिच्याविषयी बदनामीकारक मजकूर टाकून तिचा मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. हा प्रकार तिच्या मित्र-मैत्रिणीकडून समजताच तिने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला, वारंवार विनंती करुनही तिचा या अज्ञात व्यक्तीकडून मानसिक शोषण सुरु होते, त्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती, या नैराश्यातून तिने आत्महत्येचा निर्णय घेतला होता, हा प्रकार तिच्या पालकांच्या निदर्शनास येताच तिने पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला.

पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तिच्याबाबत घडणारा प्रकार सांगितला. त्यानंतर शबानाचे सायबर सेलच्या अधिकार्‍यांनी समुपदेशन करुन तिला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला, तिची जबानी नोंदवून अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. फेसबुकच्या नोडल अधिकार्‍यांशी संपर्क साधून त्यांची मदत घेतली. त्यानंतर तिला येणार्‍या कॉल, मॅसेजसह तिच्या सोशल मिडीयावर अपलोड झालेल्या मजकूराची माहिती काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी एका 21 वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

First Published on: September 14, 2020 7:11 AM
Exit mobile version