दोन वर्षाची चिमुकली अवघ्या सहा तासात आईच्या कुशीत

दोन वर्षाची चिमुकली अवघ्या सहा तासात आईच्या कुशीत

दोन वर्षाची चिमुकली अवघ्या सहा तासात आईच्या कुशीत

भिवंडीत अपहरणाच्या घटणांमध्ये वाढ झाली आहे. भिवंडीच्या काटई बाग परिसरात अवघ्या दीड वर्षाची चिमुकली बेपत्ता झाली होतीय. या चिमुकलीला निजामपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांच्या पथकाने अवघ्या सहा तासात शोधले. पोलिसांनी या चिमुकलीला तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे.

पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक

काटई बाग येथे राहणारे संजय पासवान यांची दोन वर्षाची चांदणी ही घराबाहेर खेळताना अचानक बेपत्ता झाली. तिचा शोध घेऊनही न मिळाल्याने त्यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. याची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दाभाडे, पोलीस उप निरीक्षक खताळ यांनी परिसरात शोधाशोध करून तपास केला. मुरली रहदास यांच्याकडे मुलगी आढळून आली. खेळता खेळता रस्ता चुकल्याने रडत होती. त्यामुळे तिला खाऊ देऊन नवीन कपडे घेऊन तिला घरी सुखरूप ठेवल्याचे त्यांनी सांगितले. चांदणी या चिमुकलीला पोलीस ठाण्यात आणून तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र मुरली रहदास यांच्यासारखे जागृत नागरिक असल्याने मोठा अनर्थ टळला असून शहरात वाढत्या अपहरणाच्या घटना पाहता आई-वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांवर तेवढेच लक्ष देणे गरजेचे आहे. निजामपूर पोलिसांनी अवघ्या सहा तासात चिमुकलीचा शोध घेतल्याने पोलिसांचे नागरिकांमधून कौतुक करण्यात येत आहे .

First Published on: May 18, 2019 10:01 PM
Exit mobile version