मुंडेंना वाचवले आता राठोडांना ठाकरे सरकार वाचवतंय, किरीट सोमय्यांची सरकारवर चौफेर टीका

मुंडेंना वाचवले आता राठोडांना ठाकरे सरकार वाचवतंय, किरीट सोमय्यांची सरकारवर चौफेर टीका

मुंडेंना वाचवले आता राठोडांना ठाकरे सरकार वाचवतंय, किरीट सोमय्यांची सरकारवर चौफेर टीका

राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय चर्चांणा उधाण आले आहे. पूजा चव्हाण ही तरुणी बीडची असून पुण्यात इंग्लिश स्पिकिंगच्या कोर्ससाठी आली होती. पुण्यातील राहत्या इमारतीतून पडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. परंतु पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा राज्यमंत्री संजय राठोड यांचा असल्याचा म्हटले जात आहे. त्यामुळे राज्यमंत्री संजय राठोड वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला ८ दिवस झाले तरी राज्यमंत्री संजय राठोड बाहेर आले नाहीत. यामुळे महाविकास आघाडीची विरोधी पक्षाने कोंडी केली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा आणि पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी संजय राठोड यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तर मुख्यमंत्री काय शरद पवारांच्या आदेशाची वाट पाहत आहेत का? असे म्हणून टोला लगावला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्यमंत्री संजय राठोड आज राजीनामा देणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर पूजा चव्हाण प्रकरणावरून पुन्हा घणाघात केला आहे. ठाकरे सरकारमधील नेते धनंजय मुंडे यांना तीन बायका आहेत. तरी शरद शरद पवारांनी मुंडेची पाठराखण करत वाचवले आहे. आता मुख्यमंत्री संजय राठोड यांना वाचवत आहेत. राज्यमंत्री राठोड यांना अटक व्हायला हवी मुख्यमंत्री काय शरद पवारांच्या आदेशाची वाट पाहत आहेत. का असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. यापूर्वी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांनी १९ बंगले ढापले, मंत्री अनिल परब यांनी म्हाडाची जमिन ढापली आणि मुंबईच्या महापौरांनी गाळे ढापले असल्याचा आरोप केला आहे.

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. या प्रकरावरुन राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. पूजा चव्हाण प्रकरणात राज्यमंत्री संजय राठोड राजीनामा देणार का? महाविकास आघाडी यावर काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

First Published on: February 16, 2021 9:32 AM
Exit mobile version