कोरोनाच्या दोन्ही लस घेऊनही का होतो संसर्ग ?

 कोरोनाच्या दोन्ही लस घेऊनही का होतो संसर्ग ?

केईएम रुग्णालयातील वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असून यातील दोन विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. यामुळे पुन्हा एकदा लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे समोर आल्याने लसीबाबत सामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

तर दुसरीकडे देशात लसीकरणास सुरुवात झाल्यापासूनच कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो असा इशारा तज्जमंडळी देत आहेत. पण त्याचबरोबर लसीकरण झालेल्या व्यक्तीला जरी कोरोनाचा संसर्ग झाला तरी तो गंभीर स्वरूपाचा नसेल असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे. दरम्यान, तज्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार एखाद्या लसीकरण झालेल्या रुग्णाला सहव्याधी असेल तरच त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते. अन्यथा अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरातच विलगीकरणात राहून बरे होऊ शकतात असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे. यामुळे दोन्ही लस घेतल्यानंतर बेफीकीर राहू नये असा सल्ला तज्ज्ञमंडळांनी आवर्जून दिला आहे.

मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोना रुग्णसंख्येचा आकड्यात चढ उतार सुरू आहे. त्यातही कोरोनाची दुसरी लस घेतलेल्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण पुण्यात सर्वाधिक असल्याचं समोर येत आहे. यामागे नागरिकांची बेफीकीरी हे प्रमुख कारण असल्याचं अजित पवार यांनीही स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस म्युंटेट होत असल्याने त्याची रुपेही बदलत आहेत. यामुळे बऱ्याचेवळा सहव्याधी असलेल्या व्यक्तींसाठी लसीकरणानंतरही कोरोनाचा धोका कायम असल्याचे समोर आले आहे. यामुळे लसीकरण झाले याचा अर्थ कोरोना होणारच नाही असा नसून नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

First Published on: October 1, 2021 7:43 PM
Exit mobile version