पाळीव प्राण्यांपासून रहा दूर, ठाण्यात पोस्टरबाजी!

पाळीव प्राण्यांपासून रहा दूर, ठाण्यात पोस्टरबाजी!

करोना व्हायरस चाचणी

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला घाबरत, संसर्ग टाळण्यासाठी लोकांना पाळीव प्राणी आणि आजारी प्राण्यांपासून दूर रहाण्यास सांगणारे पोस्टर ठाण्यात लावण्यात आले होते. मात्र नवी मुंबईतील काही प्राणीप्रेमी कार्यकर्त्यांनी हे पोस्टर काढले. प्राण्यांनमार्फत करोना व्हायरसची भीती आहे असा त्यांनी दावा केला होता. मात्र त्याबाबतचा कोणताही पुरावा नसल्याचे कार्यकर्त्यांनी ते पोस्टर काढून टाकले.

गेल्या आठवड्यात अल्फा फाउंडेशनच्या सदस्यांनी ठाण्यात पोस्टर लावून नागरिकांना पाळीव प्राणी आणि आजारी प्राण्यांशी संपर्क टाळण्याची विनंती केली होती. प्राण्यांमुळे करोनासारखे संसर्ग पसरत असल्याचे ते सांगत होते. मात्र याबाबतचे काहीही पुरावे नसल्याने बऱ्याच संस्था, एनजीओंनी या प्रकाराला विरोध केला आहे. अशा अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये कारण कोणत्याही पाळीव प्राण्यांना किंवा पक्षांना या विषाणूची लागण झाल्याचे किंवा हा रोग आढळल्याचा कोणताही वैद्यकीय अहवाल नाही.

ठाण्यातील फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रूएल्टी टू अ‍ॅनिमल सोसायटीमध्येही काही तक्रारी आल्या आहेत. मात्र  करोना व्हायरसला घाबरण्याची कोणताही बाब नाही. कारण आतापर्यंत प्राण्यांमुळे हा आजार होत असल्याची कोणतीही बातमी आलेली नाही. तरीही स्वच्छतेची काळजी घेण्याचे आव्हान ठाणे एसपीसीएचे अध्यक्ष शकुंतला मजुमदार यांनी केले आहे.

First Published on: February 26, 2020 4:48 PM
Exit mobile version