वंचित बहुजन आघाडीचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरेना

वंचित बहुजन आघाडीचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरेना

प्रातिनिधिक फोटो

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची ३७ उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहिर झाली. मात्र पहिल्या यादीत राजकीयदृष्टया महत्वाचा समजला जाणाऱ्या कल्याण लोकसभेला स्थान मिळालेलं नाही. कल्याणमधून आनंदराज आंबेडकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकत्यांनी केली आहे. मात्र आनंदराज हे लोकसभा निवडणूक लढविण्यास आनंदराज हे इच्छूक नसून त्यांनी नकार दर्शविल्याचेही समजते. मात्र कल्याणातून इच्छूकांची भाऊगर्दी वाढली असून, त्यामध्ये सेवानिवृत्त अधिकारी, डॉक्टर अशी उच्चशिक्षितांची यादी आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे पहिल्या यादीत कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरू शकलेला नाही.

प्रकाश आंबेडकर यांनी केली यादी जाहीर

काँग्रेसकडून जागा वाटपावर तोडगा न निघाल्याने अखेर वंचित बहुजन आघाडीने ४८ पैकी ३७ उमेदवारांची यादी भारीपचे अध्यक्ष व वंबआचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी जाहिर केली. समाजातील वंचित घटकाला सामावून घेत प्रत्येक समाजाला उमेदवारी मिळावी असा आघाडीचा हेतू आहे त्या दृष्टीकोनातून उमेदवारी जाहिर केली जात असल्याचे पक्षातील एका पदाधिका-याने सांगितले. वंचित बहुजन आघाडीत भारीप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना आणि एमआयएमचा समावेश आहे. कल्याणात दलित बहुजन आणि मुस्लिमांच्या मतांची संख्या अधिक असल्याने रिपब्लिकन सेनेचे नेते आंनदराज आंबेडकर यांनीच ही जागा लढवावी अशी गळ कार्यकत्यांनी घातली आहे मात्र लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे आनंदराज यांनी नकार दिल्याचेही त्या पदाधिकाऱ्याने सांगितले. कल्याणातून इच्छूकांची संख्या अधिक आहे. त्यामध्ये सरकारी सेवानिवृत्त अधिकारी काही सनदी अधिकारी तसेच डॉक्टर इंजिनिअर आदींनी पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छा दर्शविली आहे. आनंदराज आंबेडकर यांची मागणी आणि इच्छूकांची झालेली भाऊगर्दी यामुळे पहिल्या यादीत कल्याणचा उमेदवार ठरू शकलेला नाही असेही खास सुत्रांनी सांगितले. येत्या दोन दिवसात कल्याणचा उमेदवार जाहिर होणार असल्याचेही त्या पदाधिका-यांकडून सांगण्यात आलं. सध्या कल्याण लोकसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्याचे नगरसेवक बाबाजी पाटील यांना उमेदवारी जाहिर केलीय. तर शिवसेनेतून खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे रिंगणात असणार आहेत. मनसेची भूमिका अजूनही अस्पष्ट आहे.

First Published on: March 15, 2019 9:42 PM
Exit mobile version