मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून ट्रेंडिंग

मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून ट्रेंडिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त देशवासीयांपासून ते राजकीय पक्षातील नेते, विरोधी पक्षातील नेते यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असला तरीही ट्विटरवर मात्र काही तरी वेगळच ट्रेंड होत आहे. मोदींचा वाढदिवस ट्रेंड होत नसला तरीही ट्विटरवर सध्या टॉप ट्रेंडला एक ट्रेंड सुरू आहे, तोदेखील मोदींशीच संबंधित आहे. ट्विटरवर सध्या नेटकरांनी राष्ट्रीय बेरोजगारी दिवसाच्या निमित्ताने ट्विट करत मोठा टिवटिवाट केला आहे. त्यामुळेच हा ट्रेंड सर्वात टॉपला आहे. तर हिंदीमध्ये राष्ट्रीय बेरोजगारी दिवस ट्रेंड होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सुरू होताच मध्यरात्रीपासून राष्ट्रीय बेरोजगार दिवस ट्रेंड होतोय. पण त्यापेक्षाही नेटकर सर्वाधिक ट्विट करत आहेत तो ट्रेंड आहे #NationalUnemploymentDay हा हॅशटॅग. या टॅगचा वापर एकुण २.४५ मिलिअन इतक्या नेटकरांनी केला आहे. या ट्विटमध्ये एक महत्वाच ट्विट आहे ते म्हणजे कॉंग्रेस नेते रागुल गांधी यांचे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांना वाढदिवसाच्या दिवशीही टोमणा मारत म्ंहटल आहे की, देशात इतकी बेरोजगारी वाढली आहे ज्यामुळे आजच्या दिवसाला #NationalUnemploymentDay म्हणाव लागत आहे. रोजगार मिळणे म्हणजे गौरव असतो. पण आणखी किती वेळ सरकार बेरोजगारी वाढत आहे हे नाकारणार आहे असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

काही नेटकरांनी सरकारला उद्देशून ट्विटमध्ये म्हंटले आहे की भाषण नाही रोजगार हवा. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या दिल्या जाणारे हे आश्वासन कुठे गेले असाही सवाल करण्यात आला आहे. आम्ही तुमच्या मन की बात मध्ये इच्छुक नाही, आम्हाला सध्या जॉब की बात महत्वाची आहे. सध्या पंतप्रधानांच्या वाढत्या दाढीपेक्षा भारताची अर्थव्यवस्था कशी वाढेल याचा विचार करायला हवा असे नेटकरांनी पंतप्रधानांना सुनावले आहे.

 

देशात सध्या एक कोटी रोजगार मागत आहेत, तुलनेत उपलब्ध असणाऱ्या रोजगारांचा आकडा केवळ १.७७ लाख इतकाच आहे. बेरोजगार अशा तरूणांमध्ये सर्वाधिक रोजगाराची मागणी ही बंगालमधून आहे. उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी आणि बिहार तिसऱ्या स्थानी आहे, तर दिल्ली चौथ्या स्थानी आहे. सर्वाधिक रोजगाराची संधी ही गुजरातमध्ये ६६४२ इतकी आहे. गुजरातपाठोपाठ बंगाल, बिहार, दिल्ली, यूपी यासारख्या राज्यांमध्ये रोजगाराच्या संधी आहेत.

इतक्या तरूणांना हवाय रोजगार 

बंगाल २३.६१ लाख
यूपी १४.६२ लाख
बिहाप १२.३२ लाख
दिल्ली ९० हजार
हरियाणा ७१ हजार
झारखंड ९३ हजार
उत्तराखंड ४९ हजार
—————————-
रोजगाराच्या संधी

गुजरात ६६४२
बंगाल ४०३१
बिहार ३७७६
दिल्ली १८०४
यूपी ११८८
हरियाणा ८९७
झारखंड २१६


 

First Published on: September 17, 2020 2:23 PM
Exit mobile version